शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इंधनबचतीचे महत्त्व जनमनात रुजवण्यासाठी डोंबिवली ते कोल्हापूर सायकल सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:04 IST

धर्मेश ठक्कर, डॉ. योगेश चौघुले, श्रीराज अय्यर अशी या तिघा सायकलस्वारांची नावे आहेत.

अनिकेत घमंडीठाणे : सुदृढ, उत्तम आरोग्य तसेच इंधनबचतीचे महत्त्व जनमनात रुजवण्यासाठी डोंबिवली सायकल क्लबचे तिघे सदस्य मागील वर्षापासून नववर्षाच्या निमित्ताने डोंबिवली ते कोल्हापूर सायकल प्रवास करत आहेत. यंदाही ते सोमवारी श्री गणेश मंदिर येथून सायकलवर स्वार झाले आहेत. शुक्रवारी १ जानेवारीला ते कोल्हापूरला अंबाबाईचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करणार आहेत.

धर्मेश ठक्कर, डॉ. योगेश चौघुले, श्रीराज अय्यर अशी या तिघा सायकलस्वारांची नावे आहेत. डोंबिवली सायकल क्लबतर्फे ते दररोज तर, रविवारी लांबवर सायकल सफर करतात. कोरोनाच्या लॉकडाऊनकाळातही पहिले तीन महिने त्यांच्या सायकलिंगला ब्रेक लागला. परंतु, नंतर टप्प्याटप्प्याने त्यांनी सायकलिंग सुरू केले.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी तिघांनीच कोल्हापूरपर्यंत सायकल प्रवास करण्याचे ठरवले. सोमवारी त्यांनी डोंबिवली ते पुणे  गाठले.  मंगळवारी सातारा, तिसऱ्या दिवशी नारसोबावाडी करून चौथ्या दिवशी गुरुवारी ते कोल्हापूरला पोहोचणार आहेत. तिथून १ जानेवारीला आई अंबाबाईचे दर्शन घेऊन परत सायकलिंग करत डोंबिवली गाठणार आहेत.

सध्या थंडीचा चांगलाच कडाका आहे.  या वातावरणाचा फायदा घेत दररोज १५५ किमीचा प्रवास करणे शक्य होत आहे. अशा पद्धतीने चार दिवसांत एकूण ४५६ किलोमीटरचा प्रवास आम्ही करणार असल्याचे ते म्हणाले. परतीचा प्रवासही अशाच पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या उपक्रमाचे डाेंबिवलीतील नागरिकांनी स्वागतच केले असून संदेशाचे आचरण करावे अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे.

टॅग्स :Cyclingसायकलिंगthaneठाणे