शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

Dombivali: चुगली लावल्याच्या वादातून मित्रांनी केली मित्राची हत्या; दोघांना अटक

By प्रशांत माने | Updated: May 26, 2023 20:59 IST

Crime News: दारुवाल्याकडे चुगली लावल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोघा मित्रांनी अन्य एका मित्राला लाथाबुक्क्यांनी आणि दांडक्याने जीवे मारुन त्याचा मृतदेह दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली फेकल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली.

- प्रशांत माने

डोंबिवली - दारुवाल्याकडे चुगली लावल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोघा मित्रांनी अन्य एका मित्राला लाथाबुक्क्यांनी आणि दांडक्याने जीवे मारुन त्याचा मृतदेह दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली फेकल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली.

 राजेश रामवृक्ष सहानी (वय ३८) असे मृत मित्राचे नाव असून याप्रकरणी दादु मटु जाधव उर्फ पाटील (वय ४५) आणि विनोद पडवळ या दोघांना दोन तासांतच अटक करण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. हा हत्येचा प्रकार पुर्वेकडील सोनारपाडा गावदेवी मंदिराचे समोरील साईश्रध्दा बिल्डिंग मध्ये घडला. तिघांनाही दारुचे व्यसन होते. रात्रभर तिघेही घरात दारु पित बसले होते. दारुवाल्याकडे चुगली करतो या कारणावरून पहाटेच्या सुमारास वाद झाला. तो विकोपाला गेला आणि दादू आणि विनोदने राजेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दांडक्याने त्यांच्यावर प्रहार केले यात राजेश चा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला असं भासवण्यासाठी त्याला दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली फेकले तसेच घरात पडलेले रक्त कपड्याने पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि दोघेही घरातून पसार झाले.

दरम्यान शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तिचा मृतदेह बिल्डिंगच्या मागे पडला असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळताच त्यांचं एक पथक घटनास्थळी हजर झाले. प्राथमिक चौकशीत एका घरातून रात्रीच्या सुमारास भांडणाचा आवाज येत होता तसेच घरातील एक व्यक्ती शेजारी राहणाऱ्याकडे दांडका मागण्यासाठी गेला होता अशी माहिती समोर आली. अखेर पोलिसांनी कसोशीने केलेल्या तपासात पसार झालेल्या दादू आणि विनोद या दोघांचा थांगपत्ता लावत त्यांना एका दारूच्या गुत्त्यावरुन अटक केली. डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे आणि मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांना या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेdombivaliडोंबिवली