शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

डोंबिवलीतील कंपन्यांना १२.५० कोटी रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:28 IST

प्रदूषण मंडळाच्या नोटिसा; निकष न पाळल्याचा ठेवला ठपका

कल्याण : डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण करणाऱ्या ५० पेक्षा जास्त कंपन्यांना प्रत्येकी २५ लाखांच्या दंडाच्या नोटिसा पाठवण्यात आल्या असून सुमारे १२ कोटी ५० लाखांचा दंड भरावा लागणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाने हरित लवादाच्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे. पाच वर्षांत प्रदूषण रोखण्यासाठी अटी-शर्ती आणि निकषांची पूर्तता न केल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा बडगा उगारला आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या यंदाच्या प्रदूषित शहरांच्या अहवालात डोंबिवली, तारापूर, तळोजा आणि औरंगाबाद ही शहरे सर्वाधिक प्रदूषित शहरे ठरली होती. या अहवालाची दखल घेतच हरीत लवादाने तातडीने प्रदूषण नियंत्रण मंडळास कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार केलेल्या या कारवाईनुसार या कंपन्यांना दंड भरणे बंधनकारक आहे.नोटिसांना मुदतीत प्रतिसाद न दिल्यास या कंपन्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे.२०१५ मध्ये हरित लवादाच्या आदेशानुसार सुनावलेल्या दंडाची रक्कम कोकण विभागीय आयुक्तांकडे सहा महिन्यांत जमा करणे बंधनकारक होते. मात्र हा दंड भरलाच गेला नाही. त्यामुळे दंडाची नोटीस ५० पेक्षा जास्त कंपन्यांना पाठवलेली असली तरी हा दंडही कंपन्यांकडून भरला जाणार नाही, असे ‘वनशक्ती’चे प्रमुख डी. स्टॅलिन यांनी सांगितले.गत महिन्यात डोंबिवली एमआयडीसीतील गुलाबी रस्ता गाजला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याठिकाणी पाहणी करून प्रदूषणकारी कंपन्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ आणि औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वेक्षण करून कंपन्यांची वर्गवारी करीत आतापर्यंत ३११ कंपन्यांचे सर्वेक्षण पार पडलेले आहे. त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर केला जाणार आहे.नोटिसांमध्ये तपशीलच नाही : देवेन सोनीकामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी म्हणाले की, पाच वर्षांत प्रदूषण नियंत्रण मंडळाने मॉनिटरिंग केले आहे. त्या आढाव्याच्या आधारेच या नोटिसा बजावल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्येक कंपनी मालकास सायक्लोस्टाइल नोटीस देण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने धन्यता मानली आहे. या नोटिसांमध्ये कोणत्या निकषांची पूर्तता केलेली नाही, तसेच आढाव्याचा तपशील काय याचा उल्लेख नाही.

टॅग्स :pollutionप्रदूषण