शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

लोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे : सदानंद राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 02:46 IST

ठाणे शासनाचे लोककला कलाकारांकडे लक्ष नाही. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे उलटल्यानंतरही या कलाकारांच्या उपजीविकेचे साधन कमी होत चाललेले आहे.

ठाणे : शासनाचे लोककला कलाकारांकडे लक्ष नाही. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे उलटल्यानंतरही या कलाकारांच्या उपजीविकेचे साधन कमी होत चाललेले आहे. म्हणूनच, लोककलेचा अस्त होत आहे. लोककलेला व्यासपीठ मिळत नाही, अशी खंत व्यक्त करून लोककला, लोकनृत्य अभ्यासक, संशोधक सदानंद राणे यांनी लोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्या वतीने बुधवारी अत्रे कट्ट्यावर ‘लोकगंगा आपुल्या दारी’ या विषयावर राणे यांचे व्याख्यान ध्वनिचित्रफितीसह आयोजित केले होते. यावेळी ते म्हणाले की, भारत हा देश सर्वगुणसंपन्न आहे. समृद्धी, संस्कृती, लोककला, लोकनृत्य, परंपरा या सर्व गोष्टी आपल्या देशात आहेत. लोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे, असे शासनाला सांगितले आहे. किमान, महाराष्ट्रातील लोककला, लोकनृत्याचे डॉक्युमेंटेशन करावे, जेणेकरून याची माहिती तरुण पिढीला होईल. लोककला, लोकनृत्य हे दोन वेगळे भाग आहेत. परंपरेनुसार लोकनृत्य पहिले आहे. पाच हजार वर्षांपासून लोकनृत्य परंपरा आहे. आदिवासी समाजाने ही परंपरा उचलली. त्यांच्या कामातून, श्रमातून निरनिराळ्या गोष्टी येऊ लागल्या. अवजारांतून गाणी निर्माण केली. प्रत्येक जमात त्यांचा जो पारंपरिक व्यवसाय करत आली, त्या व्यवसायातील अ‍ॅक्शन नृत्यात येत गेल्या. प्रत्येक जिल्ह्याच्या लोकनृत्यात फरक आहे. लोककला जोपासणे कठीण आहे. कला चालली पाहिजे, घरही चालले पाहिजे, याचा मेळ घालणे कठीण आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील लोकनृत्य दाखवून त्याची त्यांनी माहिती दिली. यात बोहाडा, पश्चिम महाराष्ट्राचे डहाका, भारूड, नागपूरमधील खडी गंमत, कोकणातील नमन, आदिवासींचे उरण तालुक्यातील डेंगा नृत्य, सांगली जिल्ह्यातील धनगर नृत्य, गोव्याचे तिक्री नृत्य, गुजरातमधील राठवा नृत्य, महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर केले जाणारे डांगी नृत्य, राजस्थानचे तेरह ताली अशा विविध लोकनृत्यांची त्यांनी प्रेक्षकांना मनोरंजक माहिती दिली.विदेशी मंडळी भारताची लोकलला शिकून त्यांच्या देशात शिकवतात. त्यांना भारतीय लोककलेचे प्रचंड आकर्षण आहे. आपले लोक मात्र याबाबत उदासीन आहेत, अशी नाराजी सदानंद राणे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणे