शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

बिल न दिल्याने मृतदेह देण्यास डॉक्टरांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 05:49 IST

अंबरनाथमधील प्रकार : मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली धाव

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : अंबरनाथ एमआयडीसीमध्ये असलेल्या विजय केअर सेंटरमध्ये बिल न दिल्याने एका महिलेचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. ही बाब मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी रुग्णालयात गोंधळ घालत तो मृतदेह स्वतः उचलून त्यावर अंत्यसंस्कार केले.

अंबरनाथमध्ये एमआयडीसी भागात विजय कोविड केअर सेंटर असून या सेंटरमध्ये बदलापूरच्या रहिवासी असलेल्या मीरा बनकर या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून ही महिला मृत्यूशी झुंज देत होती. अखेर रविवारी सकाळी साडेसात वाजता त्यांचा मृत्यू झाला. याची कल्पना मृत महिलेच्या मुलांना देण्यात आली. मृत महिलेची मुलगी आणि मुलगा या दोघांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात गेले असता जोपर्यंत बिल भरत नाही तोपर्यंत मृतदेह न देण्याचा निर्णय तेथील डॉक्टरांनी घेतला. अखेर या प्रकरणी कोणताही तोडगा निघत नसल्याने ही दोन्ही मुले डॉक्टरांच्या भूमिकेमुळे स्तब्ध झाली होती.

या प्रकरणाची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच मनसेचे जिल्हा उपसंघटक शैलेश शिर्के यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात धाव घेत रुग्णालय प्रशासनाला मृतदेह देण्यास सांगितले, मात्र रुग्णालय प्रशासनाने अरेरावीची भाषा करीत मृतदेह न देण्याचा अट्टाहास कायम ठेवला. त्यावरून रुग्णालयातील कर्मचारी आणि मनसे पदाधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाले आणि त्यानंतर धक्काबुक्की झाली. या वेळेस चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांनाही धक्काबुक्की करण्यात आली. 

प्रशासनाने नमते घेतले हा सर्व प्रकार झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने नमते घेत मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. मात्र रुग्णालयातील कोणत्याच कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला हात न लावल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मृतदेह उचलून शववाहिनीत ठेवला. एवढेच नव्हे तर बदलापूरच्या स्मशानभूमीत त्या महिलेवर अंत्यसंस्कारही केले.

टॅग्स :doctorडॉक्टर