शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांच्या आधारे डॉक्टरची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 01:13 IST

बुलडाणा येथील डॉ. प्रदीप डाबेराव यांची एक लाख ९८ हजारांची फसवणूक करणाऱ्या पृथ्वी अमिन याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे : संकेतस्थळावर खासगी साइटवर जाहिरात देऊन कारची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री करून बुलडाणा येथील डॉ. प्रदीप डाबेराव यांची एक लाख ९८ हजारांची फसवणूक करणाऱ्या पृथ्वी अमिन याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.दंतचिकित्सक डॉ. डाबेराव यांचा उंद्री (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथे दवाखाना आहे. नेहमी बाहेरगावी जावे लागत असल्यामुळे त्यांना जुनी कार घ्यायची होती. त्यासाठी या वेबसाइटवर अशा कारचा ते शोध घेत होते. त्याचवेळी त्यांना एका टोयोटो कारची जाहिरात पाहायला मिळाली. २०१६ चे मॉडेल असलेल्या या कारची किंमत तीन लाख ७५ हजार रुपये दाखवण्यात आली होती. ती पसंत पडल्याने त्यांनी या कारच्या मालकाशी ओएलक्सच्या खात्यावर संपर्क साधला. २७ डिसेंबर २०१८ पासून त्यांच्यात या व्यवहाराची बोलणी सुरूझाली. पृथ्वी अमिन असे नाव सांगणाºया या व्यक्तीने ठाण्यातील आर मॉल येथील कॉल सेंटरमध्ये नोकरीला असल्याचे सांगितले. नंतर, या गाडीची किंमत त्याने दोन लाख ७५ हजार रुपये सांगून ती ३१ डिसेंबर २०१८ पूर्वी विक्री करायची असून पैसे रोखीमध्ये घेणार असल्याचेही सांगितले. ही गाडी घेण्यासाठी त्याने त्यांना ३१ डिसेंबर रोजी ठाण्यात बोलवले. ठाण्याच्या घोडबंदर रोडवर डॉ. डाबेराव हे त्यांचे मित्र स्वप्नील कोतवाल, मेकॅनिक अमोल गुजर हे दुपारी १२.४५ वा. पोहोचले. तिथे आर मॉलसमोर पृथ्वी याने ग्रे रंगाची इटिओस लिव्हा ही कार दाखवली. ती योग्य वाटल्यानंतर कागदपत्रे पाहून त्याला एक लाख ९८ हजार रुपये दिले. ती कार घेऊन ते १ जानेवारी रोजी बुलडाणा येथे पोहोचले. त्यांनी दिलेली कारची कागदपत्रे बनावट असल्याचे ठाणे आरटीओ कार्यालयाकडून त्यांना काही दिवसांनी समजले.>आरटीओमुळे समजला फसवणुकीचा प्रकारवाहनाची कागदपत्रे बनावट असल्याचे आरटीओकडून समजल्यानंतर डॉ. डाबेराव यांनी ७ जानेवारी रोजी ठाण्यातील पृथ्वीचा शोध घेतला. मात्र, त्याचा पत्ता आणि कागदपत्रेही बनावट आढळली. त्यावरुन आपली फसवणूक झाल्याचे डाबेराव यांना समजले.डॉ. डाबेराव यांनी याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात २० जानेवारी रोजी एक लाख ९८ हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.