शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

आयसीयू बेडसाठी दीड लाख रुपये घेणाऱ्या डॉक्टरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 05:40 IST

ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू) कोरोना रुग्णाला दाखल करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणात डॉ. परवेझ शेख (४२, रा. वांद्रे) याला कापूरबावडी पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. त्याला २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. शेखसह पाच जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या सूचनेनुसार हा गुन्हा २३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास दाखल करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहेत. रुग्णांना आवश्यकतेनुसार आयसीयू आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येतात. तरीही या रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप वसईतील एका रुग्णाच्या नातेवाइकांनी केला होता. समाजमाध्यमांतून या देवाणघेवाणीची चित्रफीत गुरुवारी व्हायरल झाली. त्यानंतर मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे गुरुवारी केली. याची गांभीर्याने दखल घेत महापौर म्हस्के यांनी संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेच्या वतीने उपायुक्त विश्वनाथ केळकर आणि डॉ. अविनाश माळगावकर यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच खंडणीचा गुन्हा दाखल केला. यामध्ये मे.ओमसाई आरोग्य केअर प्रा.लि. या खासगी कंपनीत सल्लागार असलेला डॉ. परवेझ तसेच नाझनीन, अबिद खान, ताज शेख आणि अब्दुल खान अशा पाच जणांचा कथित आरोपींमध्ये समावेश आहे.

काय घडला प्रकार?डॉ. परवेझ याच्यासह पाचही आरोपींनी आपसात संगनमत करून दोन कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांकडे ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यासाठी २२ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दीड लाखांची मागणी करून ते  स्वीकारले. डॉ. परवेझ यांनी नियमबाह्यपणे रुग्णाला याठिकाणी प्रवेश दिला. त्यांचा यात कशा प्रकारे सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालय येथे अबीद या रुग्णवाहिका चालकाने रुग्णाच्या मुलाला ग्लोबलसाठी ताज शेखला भेटण्यास सांगितले. त्यानंतर ताज आणि अब्दुल या दोघांकडे ही दीड लाखांची रक्कम रुग्णाच्या नातेवाइकांनी सुपूर्द केल्याचा आरोप आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या