शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काळजी नको, खंडग्रास ग्रहणात बिनधास्त प्या मसाले दूध! खगोल अभ्यासक दा. कृ. सोमणांचा निर्वाळा

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 26, 2023 08:07 IST

ग्रहणात हवा प्रदूषित असल्याने चंद्रग्रहणाच्या काळात कोजागिरी साजरी करायची की नाही, मसाला दूध प्यायचे की नाही, असे प्रश्न लोकांच्या मनात असतात.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  येत्या शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेच्या रात्री खंडग्रास चंद्रग्रहण होणार असून, ते संपूर्ण भारतातून दिसणार, असे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. तसेच ग्रहणासंबंधी प्राचीन काळापासून गैरसमजुती होत्या व आहेत. ग्रहणात हवा प्रदूषित असल्याने चंद्रग्रहणाच्या काळात कोजागिरी साजरी करायची की नाही, मसाला दूध प्यायचे की नाही, असे गैरसमज लोकांच्या मनात असतात. परंतु लोकांनी चंद्रग्रहण काळात अगदी आनंदाने दूध प्यावे, असा निर्वाळा खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिला.

याविषयी अधिक माहिती सांगताना सोमण म्हणाले की, येत्या शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजून ५ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. रात्री १ वाजून ४४ मिनिटांनी ग्रहणमध्य होईल. त्यावेळी सहा टक्के चंद्रबिंब ग्रासीत दिसेल. चंद्रग्रहण उत्तररात्री २ वाजून २३ मिनिटांनी समाप्त होईल. हे चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी सर्वांना पाहता येईल. हे चंद्रग्रहण संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, युरोप आणि आफ्रिका या देशांतूनही दिसेल, असे सोमण यांनी सांगितले. यापूर्वी १९८६ मध्ये कोजागरीच्या रात्री खग्रास चंद्रग्रहण दिसले होते. २०२४ मध्ये एकही ग्रहण भारतातून दिसणार नाही. यानंतर ७ सप्टेंबर २०२५ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. ग्रहण काळाबद्दल असणाऱ्या गैरसमजाबद्दल माहिती देताना त्यांनी अनेक शंकांचे निरसन केले.

ग्रहण काळात हवा प्रदूषित होते, असा गैरसमज आहे. त्यामुळे अनेक जण ग्रहण काळात अन्न सेवन करीत नाही. मग कोजागरी साजरी करायची की नाही, असा प्रश्न काहींना पडतो. अनेक सोसायट्यांमध्ये कोजागरीनिमित्त जेवण व मसाला दूध सेवनाचे कार्यक्रम ठेवायचे असतात. योगायोगाने कोजागरीला शनिवार आला आहे. परंतु, चंद्रग्रहणात कोजागरी साजरी करण्यात कुठलीही अडचण नाही, असे सोमण म्हणाले.

...तो श्रद्धेचा विषय झाला

ग्रहणात गरोदर स्त्रीने भाजी चिरली तर व्यंग असलेले मूल जन्माला येते, हाही एक गैरसमज होता. उलट ‘थायलिडोमाईड’ नावाचे चुकीचे औषध युरोपमध्ये अनेक गरोदर महिलांनी घेतल्यामुळे विकृत मुले जन्माला आली होती. ग्रहणविषयक धार्मिक नियम पाळायचे की नाही, हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा विषय आहे. इकडे भारतीय शास्त्रज्ञांनी चंद्रयान-३ चंद्रावर यशस्वीरीत्या उतरविले. आपण या दिवशी चंद्रग्रहण पाहून ग्रहण कसे होते? चंद्र पृथ्वीच्या छायेत  कसा येतो, हे तरी समजून घ्यायला पाहिजे, असे सोमण म्हणाले.

 

टॅग्स :kojagariकोजागिरीLunar Eclipseचंद्रग्रहण