शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

केवळ क्रिकेटपुरते आपले देशप्रेम नको - डॉ. सुभाष भामर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 06:48 IST

भारत-पाकिस्तानचा क्रि केट सामना सुरू असताना अनेक नागरिकांचे देशप्रेम उफाळून येते.परंतु, देश व सीमेवरील जवानांना कायम नागरिकांनी पाठिंबा दिला पाहिजे, असे मत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी भिवंडीत व्यक्त केले.

भिवंडी : भारत-पाकिस्तानचा क्रि केट सामना सुरू असताना अनेक नागरिकांचे देशप्रेम उफाळून येते.परंतु, देश व सीमेवरील जवानांना कायम नागरिकांनी पाठिंबा दिला पाहिजे, असे मत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी भिवंडीत व्यक्त केले.तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांचे लोकार्पण राज्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी खासदार कपिल पाटील होते. याप्रसंगी माजी आमदार योगेश पाटील, पंचायत समितीच्या सभापती रवीना जाधव, सरपंच श्रीधर पाटील, जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी राज्यमंत्री भामरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशाच्या तिन्ही टोकांवरील भौगोलिक सीमांची परिस्थिती वेगवेगळी आहे. काही ठिकाणी २० हजार फुटांचा डोंगर आहे. तर, काही ठिकाणी केवळ १०० मीटरवर पाकिस्तानची चौकी आहे. खडतर हवामानात देशाचे संरक्षण करण्यासाठी सैनिक प्राण पणाला लावतात. त्यांना देशातील नागरिकांनी पाठिंबा द्यायला हवा. केवळ भारत-पाकिस्तान क्रि केट सामन्याच्या वेळी देशप्रेम उफाळून येता कामा नये. तर, आपण देशाचे सैनिक आहोत, ही भावना ठेवून नागरिकांनी देश व सैनिकांमागे उभे राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.काल्हेरमधील विकासकामांचा रेटा पाहून ही ग्रामपंचायत असल्याचे वाटत नाही, असे भामरे यांनी यावेळी नमूद केले. तब्बल २२ ते २५ हजार कोटींची विकासकामे मंजूर झालेला भिवंडी हा देशातील एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे, अशा शब्दांत भामरे यांनी खासदार पाटील यांच्या कामाकडे लक्ष वेधले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला. त्यातून प्रत्येक गावात काँक्रिटचे रस्ते तयार होणार आहेत. भिवंडीत मेट्रो रेल्वेसह सहापदरी बायपास मंजूर झाला आहे. या कामांचे श्रेय पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचे आहे. मात्र, याबाबत राजकारण केले जात आहे, असा आरोप पाटील यांनी केला. राष्ट्रीय हरित लवादाने खाडीतून रेती काढण्याबाबत बंदी घातली. मात्र, त्याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय होईल. त्यातून हजारो भूमिपुत्रांना दिलासा मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.काल्हेरला रणगाडा, तोफ भेटकाल्हेर ग्रामपंचायतीने उभारलेल्या उद्यानात रणगाडा बसवण्याची विनंती खासदार कपिल पाटील यांनी केली. रणगाड्याबरोबरच विकासाच्या आड येणाºया विरोधकांना उत्तर देण्यासाठी तोफ देण्याचीही विनंती खासदारांनी केली. ती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मंजूर केली. त्यांनी लवकरच काल्हेर ग्रामपंचायतीला रणगाडा व तोफ भेट देणार असल्याचे जाहीर केले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान