शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

...तोपर्यंत जादा भाडे देऊ नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:57 IST

काही रिक्षा संघटनांच्या मनमानीमुळे रिक्षाभाड्यावरून प्रवाशांमध्ये संभ्रम

डोंबिवली : काही रिक्षा संघटनांच्या मनमानीमुळे रिक्षाभाड्यावरून प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाई करण्याचा इशारा कल्याण आरटीओने नोटीस बजावून डोंबिवलीतील रिक्षा संघटनांना दिला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रामनगर वाहतूक शाखेत झालेल्या समन्वय बैठकीत दोन दिवसांत सुधारित भाड्याचा तक्ता लावण्यात येणार असल्याचा ठराव करण्यात आला. नवीन भाडेवाढ जाहीर होईपर्यंत कुणीही जादा पैसे देऊ नये, असे आवाहन आरटीओने केले आहे.बैठकीला आरटीओ अधिकारी अविनाश मराठे, वाहतूक पोलीस निरीक्षक हेमंत जाधव, लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर तसेच प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. एका युनियनने भाडे दरपत्रक लावून प्रवाशांकडून जास्त भाडे आकारले जात आहे. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी असून त्यातून अनुचित घटना घडण्याची शक्यता आरटीओ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर कोमास्कर म्हणाले की, आरटीओ सुधारित भाड्याचा फलक लावणार होती. दोन महिने झाले, पण त्यांनी ते न लावल्याने २०१४ मध्ये मंजुरी मिळालेले दरफलक लावले आहे. आरटीओ हा फलक लावणार असेल, तर सध्याचा फलक काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यावर मराठे म्हणाले की, वरिष्ठांसमवेत चर्चा करून आगामी दोन दिवसांत त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. आरटीओ आणि युनियनद्वारे फलक लावणे जास्त सयुक्तिक ठरेल. कोमास्कर यांनीही त्याला तयारी दर्शवत काही संभ्रम असेल, तर तो दूर करावा, असे सांगितले. वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांनी शहरातील बेकायदा रिक्षा वाहतूक, स्टॅण्डसंदर्भात युनियनच्या पदाधिकाºयांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.आरटीओने भाडे आकारण्यासंदर्भात फलक लावल्यानंतरच किती भाडेवाढ झाली आणि कोणत्या मार्गावरील सध्याचे भाडे कमी झाले, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने जाहीर केल्याशिवाय प्रवाशांनी जादा किंवा कमी भाडे देऊ नये. सध्या जे भाडे आहे, तेच द्यावे. रिक्षाचालकांनीही प्रवाशांची अडवणूक करू नये.- संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाdombivaliडोंबिवली