शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

खोडा घालू नका, अन्यथा घरावर मोर्चे काढू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:56 IST

सर्वपक्षीय युवा मोर्चाने दिला इशारा; २७ गावांच्या स्वतंत्र पालिकेच्या मागणीसाठी निदर्शने

डोंबिवली : २७ गावांची स्वतंत्र पालिका व्हावी, यासाठी सर्वपक्षीय युवा मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्वतंत्र नगरपालिकेच्या कार्यवाहीत खोडा घालणाऱ्यांना गुरुवारी आंदोलनाच्या माध्यमातून समज देण्यात आली. बेताल वक्तव्य करून खोडा घालण्याचे प्रकार थांबवा, अन्यथा घरावर मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा देण्यात आला. यावेळी युवा मोर्चाच्या वतीने निदर्शने करून निषेध नोंदवण्यात आला.२७ गावांची नगरपालिका स्थापन करण्याच्या विरोधात काही नगरसेवक आणि पुढारी वक्तव्य करत असल्याचा आरोप युवा मोर्चाचा आहे. संबंधित व्यक्तींचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवारी मोर्चाने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. आंदोलनात स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना दुखावणाºयांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन केले जाणार होते. परंतु, दहन आंदोलनाच्या वेळी कायदा-सुव्यवस्था धोक्यात येईल, या शक्यतेने मानपाडा पोलिसांनी सर्वपक्षीय युवा मोर्चाला नोटीस बजावली होती. त्यामुळे दहन न करता निदर्शने करण्यात आली.कल्याण-शीळ मार्गावरील स्व. भागाशेठ वझे चौक येथे सकाळी ११ वाजता झालेल्या आंदोलनात गजानन पाटील, सुधीर पाटील, संतोष केणे, गणेश म्हात्रे, रमेश म्हात्रे आदी सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाºयांचा धिक्कार असो, भ्रष्ट महापालिकेची हाव धरणाºयांचा धिक्कार असो, २७ गावांतील भूमिपुत्रांच्या हरकती व सूचनांचा अवमान करणाºयांचा धिक्कार असो, या मजकुराचे कागदी फलकही झळकावण्यात आले होते.२७ गावांमधील स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना भ्रष्टाचार आणि भूमिपुत्रांच्या जमिनीवरील आरक्षण या मुद्यावरून जुलै २००२ मध्ये केडीएमसीतून २७ गावे वगळल्यानंतर ग्रामपंचायती स्थापन झाल्या. परंतु, कुणाचीही मागणी नसताना जून २०१५ मध्ये पुन्हा गावे केडीएमसीत समाविष्ट करण्यात आली. ७ सप्टेंबर २०१५ ला पुन्हा ही गावे वगळून त्या गावांचा ‘स्वतंत्र नगरपालिका’ असा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला. या अध्यादेशाच्या समर्थनार्थ विभागीय आयुक्त कार्यालयात हजारो नागरिकांनी पत्रं सादर केली आहेत. परंतु, ही हरकती, सूचनांची पत्रं बोगस असल्याचे २७ गावांमधील काही नगरसेवकांचे म्हणणे असल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे संकेत दिले असताना जाणूनबुजून काही स्वयंघोषित पुढारी स्वतंत्र नगरपालिकेसाठी अडथळा निर्माण करत असल्याने गावांमधील आगरी-कोळी तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. असले प्रकार तत्काळ थांबवा, अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.नगरसेवकांची पाठ२७ गावांमधील नगरसेवकांचा आम्हाला पाठिंबा असल्याचे तेथील नेत्यांकडून सांगण्यात आले. परंतु, प्रत्यक्षरीत्या नगरसेवकांचा सहभाग या आंदोलनात दिसून आला नाही, तर संघर्ष समिती आणि सर्वपक्षीय युवा मोर्चा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. युवा मोर्चा ही तरुणांची संघटना असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.

टॅग्स :thaneठाणे