शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरांची नोंदणी सुरू न केल्यास ठोकणार टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:09 IST

केडीएमसीच्या २७ गावांतील घरांची नोंदणी १० महिन्यांपासून बंद असल्याने राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

कल्याण : केडीएमसीच्या २७ गावांतील घरांची नोंदणी १० महिन्यांपासून बंद असल्याने राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. तसेच २७ गावांतील भूमिपुत्र असलेल्या बिल्डरांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नोंदणी सुरू न झाल्यास रजिस्टर कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांनी दिला आहे.केडीएमसीतून २७ गावे वगळण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी महिनाभरापूर्वी दिले होते. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने समितीने सरकारला दोन महिन्यांचा अल्टीमेटम दिला आहे. महापालिका सोयीसुविधा पुरवत नाही, तर राज्य सरकार गावे वगळत नसल्याने २७ गावांची कोंडी झाली आहे. त्यातच २७ गावांतील घरांची नोंदणी बंद आहे. घरांची नोंदणी बंद करण्याबाबत कोणताही अध्यादेश काढलेला नाही, अशी बाब विक्रम पाटील यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नामुळे उघड झाली आहे. मग, राज्य सरकारचा आदेश असल्याचे सांगून घरनोंदणी का बंद केली आहे.या बंदीमुळे बिल्डर मेटाकुटीला आले आहे. कोणाच्या आदेशानुसार हा प्रकार सुरू आहे. बड्या बिल्डरांची घरे विकली जावीत, यासाठी त्यांच्या सांगण्यावरून लहान बिल्डरांचा बळी दिला जात आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे. एका घराच्या नोंदणीसाठी सरकारचे महसूल खाते दोनअडीच लाखांची फी घेते. एका दिवसाला १५० ते २०० नोंदणी होते. त्यामुळे सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. त्यामुळे नोंदणी सुरू झाल्यास रजिस्ट्रेशन आॅफिसला टाळे ठोकण्यात येईल, असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.चिंचपाड्यात उद्या सभाकल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात संघर्ष समितीतर्फे शुक्रवार, २ नोव्हेंबरला सभा होणार आहे, अशी माहिती समितीचे पदाधिकारी चंद्रकांत म्हात्रे यांनी दिली आहे. या सभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण