शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बॅकस्टेज कलाकारांच्या आयुष्यात दिवाळीत ‘ब्लॅकआउट’; शेती करून, वाहन चालवून करतोय गुजराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 23:58 IST

काटकसर करीत करणार दिवाळी साजरी

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : लॉकडाऊनकाळात रंगभूमीवर काम करणाऱ्या बॅकस्टेज कलाकारांचे अतोनात हाल झाले आहेत. कुणी ट्रक चालवून, कुणी भाजी विकून, तर कुणी शेती करून आपल्या कुटुंबाचे पोट भरत आहे. दरवर्षी नवीन कपडे, वस्तू खरेदी करून साजरी केली जाणारी दिवाळी यंदा कशी साजरी करावी, याची विवंचना या कलाकारांनी व्यक्त केली.

सुरुवातीच्या काळात एक-दोन महिने बॅकस्टेज कलाकार घरातच बसून होते. जसा काळ वाढू लागला, तसा त्यांना उदरनिर्वाहासाठी पर्याय शोधावा लागला. पोटापाण्यासाठी काहींनी भाजी विकणे, ट्रक चालवणे, ड्रायव्हिंग करणे, शेती करणे असे मार्ग शोधले.  मी किरकोळ सामान विकून घर चालवत आहे. त्यातून भागत नाही म्हणून एकदोन छोटी कामेदेखील हातात घेतली होती. पण, जे आपले काम नाही त्यात काम करणे कठीण जाते, असे वैभव पिसाट यांनी  सांगितले.

अ.भा. मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती शाखेने या कलाकारांना फुल ना फुलाची पाकळी मदत केली. परंतु, या कलाकारांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रंगभूमी पूर्वपदावर यायला वेळ लागेल. तोपर्यंत या कलाकारांची जबाबदारी सरकारने घ्यावी.   - अशोक नारकर, नियामक मंडळ, सदस्य

लॉकडाऊनकाळात गावी आलो, पण येथेही काम नसल्याने मी भातशेती करत आहे. पोट भरण्यासाठी गावात भाजीपण विकली. आता शेतीवर माझे कुटुंब जगवत आहे. दिवाळी मात्र पूर्वीसारखी जाणार नाही. नाट्यगृह सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी नेमकी कधी सुरु हाेतील याचा अंदाज नाही. - राजेश सपकाळ

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस