शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

जिल्ह्याला मिळणार पुरेसे ‘रेमडेसिविर’; मागणी-पुरवठ्यातील तफावत लवकरच होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 23:02 IST

प्रशासनाची माहिती : मागणी-पुरवठ्यातील तफावत लवकरच होणार कमी

ठाणे : कोरोनावर परिणामकारक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा जाणवत आहे. मात्र, या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना वणवण भटकावे लागू नये, यासाठी ठाणे जिल्ह्याधिकारी कार्यालयाने सुरू केलेल्या रेमडेसिविर संनियंत्रण समितीतर्फे खासगी कोविड रुग्णालयांना हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान, सध्या रुग्णालयांकडून या इंजेक्शनची होणारी मागणी आणि पुरवठा, यात मोठी तफावत असली तरी येत्या तीन ते चार दिवसांत पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही तफावत दूर होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. तसेच या आजारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. वणवण फिरूनही इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक हवालदिल होत आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात काही ठिकाणी रेमडेसिविरचा काळाबाजार व रुग्णांच्या नातेवाइकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत.

त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. रुग्णालयांनीच रुग्णाला रेमडेसिविर उपलब्ध करून द्यावे, असे सरकारने स्पष्ट केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांना रेमडेसिविरचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मागील १० ते ११ दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३१ हजार ३१० रेमडेसिविरचा पुरवठा केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली.

रुग्णालयांना ३१ हजार ३१० इंजेक्शनचा पुरवठा

जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ५४ हजार रेमडेसिविरची मागणी करण्यात आली आहे. त्यात आतापर्यंत ३१ हजार ३१० इंजेक्शन रुग्णालयांना पुरविण्यात आले आहे.मात्र, रुग्णालयांकडून होणारी मागणी आणि त्यांना आतापर्यंत केलेला पुरवठा, यात तफावत आहे. असे असले तरी येत्या तीन ते चार दिवसांत रेमडेसिविरचा पुरेसा साठा उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत पुरेसा साठा उपलब्ध झाल्यास रुग्णांच्या नातेवाइकांची इंजेक्शनसाठी होणारी परवड थांबणार आहे.

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरthaneठाणे