शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

सवाद येथे ८१८ बेडचे जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी भिवंडीतील सवाद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी भिवंडीतील सवाद येथे ८१८ खाटांच्या भव्य जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालयाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे, आ. शांताराम मोरे, आ. रवींद्र फाटक, आ. विश्वनाथ भोईर, माजी आ. पांडुरंग बरोरा, जि. प. उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे, भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर, तहसीलदार अधिक पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, जिपचे सीईओ भाऊसाहेब दांगड, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, जिप आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंगे आदी उपस्थित होते.

या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पाहुण्यांना रोबोटच्या माध्यमातून पुष्पगुच्छ देण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमावेळी रोबोट आकर्षणाचा विषय ठरले होते. तर या रुग्णालयातही रोबोटचा वापर होणार आहे.

भिवंडी-कल्याण रस्त्यावरील सवाद ग्रामपंचायत क्षेत्रातील गोदाम बांधकामाची निवड या रुग्णालयासाठी केल्याने त्याचा फायदा भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड या तालुक्यातील रुग्णांना होईल, असे नार्वेकर यांनी प्रस्ताविकेत सांगितले.

सवाद येथील जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालय दोन लाख ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळावर साकारले आहे. या रुग्णालयात महिलांसाठी ३६०, पुरुषांसाठी ३७९ ऑक्सिजन बेड आहेत. तर, ८८ अतिदक्षता बेड असून त्यात २० व्हेंटिलेटर, २० बायपॅक व ४० हायफ्लो नॅशल कॅनॉल सुविधा असे एकूण ८१८ बेड आहेत. रुग्णालयातील सर्व साहित्य हे आगरोधक असून, हे पुनः वापरात येणारे आहे. रुग्णांसाठी योगाभ्यास, करमणुकीसाठी कॅरम, दूरदर्शन संच तसेच रुग्णांना कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी १० टॅब आहेत. त्याद्वारे ते व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबीयांशी संवाद साधू शकणार आहेत. रुग्णालय परिसरात ७५ सीसीटीव्ही असून त्याच्या नियंत्रणासाठी कंट्रोल रूम आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये, यासाठी तीन ऑक्सिजन टँक तेथे लावले आहेत. रुग्णालयातील शौचालयही ऑक्सिजनयुक्त आहेत. रुग्णांसोबत काम करणारे डॉक्टर, नर्स यांचा थेट संपर्क येणार नाही, यासाठी वेगळा ‘नर्स वे’ बनविला आहे. तेथे पीपीई किट्स न घालता वेगळ्या वातावरणात त्यांना राहता येणार असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण राहणार नाही.

‘भविष्यात ग्रामीण रुग्णालयात रूपांतरित करणार’

सुरुवातीला कोरोना संकटावर मात करताना अनेक अडचणी आल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना बेडसाठी अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे हे सुसज्ज जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालय उभारण्यात आले. त्याकरिता राज्याच्या अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद केली. भविष्यात कोविडचा धोका टळल्यानंतर हे रुग्णालय जिल्हा ग्रामीण रुग्णालयात निश्चितच रूपांतरित करण्यात येईल, अशी घोषणा या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच अंबरनाथ येथे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

---------------