शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्पेशालिटीसह ५७४ बेडचे होणार जिल्हा रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 03:04 IST

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील पाच जुन्या इमारती पाडण्यास शासनाने मार्च महिन्यात अध्यादेश काढून मंजुरी दिल्यानंतर आता त्यात आणखी ६७ वाढीव बेडसह १४० बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यास १७ जुलै रोजी हिरवा कंदील दिला आहे.

ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील पाच जुन्या इमारती पाडण्यास शासनाने मार्च महिन्यात अध्यादेश काढून मंजुरी दिल्यानंतर आता त्यात आणखी ६७ वाढीव बेडसह १४० बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यास १७ जुलै रोजी हिरवा कंदील दिला आहे. या वाढीव बेडमुळे जिल्हा सामान्य रुग्णालय ५७४ बेडचे होणार आहे. तसेच ते सुरू करण्यासाठी इमारतींचे अंदाजपत्रक आणि आराखडे तयार करण्याची कार्यवाही क रण्याचे आदेशही दिले आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयाला ३३६ बेडची मान्यता दिली होती. त्यानंतर, विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी वेळोवेळी पाच वॉर्ड नव्याने सुरू करताना त्यावेळी ३१ बेडची वाढ के ल्याने सध्या त्यात ३६७ बेड कार्यान्वित आहेत.>स्थलांतराचाप्रश्न ऐरणीवर?एकीकडे शासनाने कै.श्री. विठ्ठल सायन्ना यांनी १९३६ साली ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय हे दानस्वरूपात बांधून दिले. त्या ब्रिटिशकालीन इमारतीत कार्यरत असून रुग्णालयाच्या काही इमारती सध्या अतिशय जीर्ण आणि वापरण्यास अयोग्य झाल्या आहेत. गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ते नावारूपास आले आहे. त्याच्या आवारातील ए, बी, सी,डी आणि ई या पाच जुन्या झालेल्या इमारती पाडण्याच्या प्रस्तावाला ९ मार्च २०१८ रोजी मंजुरी दिली आहे. त्यावेळी राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाच्या इमारतीत त्याचे स्थलांतरण करताना केंद्र शासनाकडून याबाबतची परवानगी मिळाल्यानंतरच ते करावे, असे म्हटले आहे. मात्र, त्याला मंजुरी मिळालेली नाही.>रुग्णालयाच्या बेडमध्ये ६७ ने होणार वाढशासनाने नव्याने मेडिकल वॉर्ड-६ बेड, लेबर वॉर्ड-३४, ट्रामा केअर युनिट-५, इन्सेटिव्ह केअर युनिट-१२, आयसोलेशन वॉर्ड-३, सायकियाट्रिक वॉर्ड-२, प्रिसोनेर वॉर्ड-३ आणि हेमाटॉलॉजी-२ असे एकूण ६७ बेडला मंजुरी दिली आहे.>सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे १४० बेडसुपर स्पेशालिटी रुग्णालयात चार विभाग सुरू होणार आहेत. त्यामध्ये कार्डिओलॉजी अ‍ॅण्ड कार्डियो वस्क्युलर सेक्शनमध्ये आयसीसीयू विभाग-१० बेड, आयसीसीयू (कॅथ लॅब)-१०, मेल वॉर्ड-१० आणि फिमेल वॉर्ड-१० तसेच न्यूरोलॉजी अ‍ॅण्ड न्यूरो सर्जरी आणि आॅन्कोलॉजी अ‍ॅण्ड ओंको सर्जरी सेक्शनमध्ये आयसीसीयू-१०, मेल वॉर्ड-१५ आणि फिमेल वॉर्ड-१५ असे प्रत्येकी बेड आहेत. त्याचबरोबर नेफ्रोलॉजी अ‍ॅण्ड डायलिसिस सेक्शनमध्ये नेफ्रोलॉजी वॉर्डमध्ये १० आणि डायलिसिस वॉर्डसाठी १० बेडचा समावेश आहे.