शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण फाटा येथील जकात नाक्याची जागा शीळ डायघर पोलीस ठाण्याला मिळणार - पालिका करणार भाडेकरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 14:52 IST

ठाणे महापालिका आता शीळ डायघर पोलीस ठाण्याकरीता जकात नाक्याची जागा भाडेतत्वावर देणार आहे. यासाठी ८६ हजार २४१ रुपयांचे मासिक भाडे आकारले जाणार आहे.

ठळक मुद्देकळवा, कासारवडवली पाठोपाठ महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णयप्रस्ताव महासभेच्या पटलावर

ठाणे - कासारवडवली, कळवा पोलीस ठाणे उभारण्यात ठाणे महापालिकेने यापूर्वी महात्वाची भुमिका बजावली होती. त्यानंतर आता कल्याण फाटा येथील जकात नाक्याची इमारत शिळ डायघर पोलीस ठाण्याकरीता देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून भाडेतत्वावर ही जागा दिली जाणार आहे.                    या संदर्भातील प्रस्ताव बुधवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. शिळ डायघर पोलीस ठाण्याची इमारत रस्ता रुंदीकरणात बाधीत होणार आहे. त्यामुळे हे पोलीस ठाणे दुसरीकडे स्थलांतरीत करणे आवश्यक ठरले आहे. ठाणे पोलिसांनी महापालिकेच्या जकात नाक्याची जागा पोलीस ठाण्याकरीता ताब्यात मिळावी अशी मागणी केली आहे. या बांधकामांचे एकूण क्षेत्रफळ हे ३९४.४७ चौ.मी. एवढे आहे. त्यानुसार मासिक भाडे हे ८६ हजार २४१ अधिक जीएसटी असे आकारले जाणार आहे. त्यानुसार ही वास्तु पुढील पाच वर्षाकरीता पोलीस ठाण्याला भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. या वास्तुमध्ये कोणत्याही स्वरुपाचा फेरफार करता येणार नाही, वीज व पाणी यांचे संयोजन स्वंतत्र घ्यावे लागणार आहे. करारनाम्यातील अटी आणि शर्तींचा भंग केल्यास भाड्याने दिलेली जागा खाली करुन घेण्यात येणार आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाPolice Stationपोलीस ठाणे