शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

कचऱ्याचा विषय जिल्हाधिकाऱ्यांकडे

By admin | Updated: January 11, 2017 07:13 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात का दिरंगाई होते आहे. त्याला नेमके कोण जबाबदार आहे,

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात का दिरंगाई होते आहे. त्याला नेमके कोण जबाबदार आहे, या प्रश्नांची उत्तरे देणारा सविस्तर अहवाल १५ दिवसांत ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर करावा, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने मंगळवारच्या सुनावणीत दिले. गेली सात वर्षे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्यादरम्यान न्यायालयाने पालिकेला आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करुन कचरा व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले होते. तशी नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला दिली. त्यात प्रगती न झाल्याने बांधकाम बंदीचा आदेश देण्यात आला. नऊ महिन्यांनी ते उठवताना डम्पिंगच्या प्रकल्पाची पूर्तता त्वरित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. हा प्रश्न घनकचऱ्याचा आहे. तो प्रदूषणाशी संबंधित आहे. त्यामुळे न्यायालयाने ती याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे वर्ग केली. मागच्या सुनावणीवेळी पालिका आयुक्तांना १० जानेवारीला हजर राहण्याचे आदेश लवादाने दिले होते. त्यानुसार मंगळवारी आयुक्त ई. रवींद्रन हजर होते. मीरा-भार्इंदरमधील घनकचराप्रकरणी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर हे देखील हजर होते. केडीएमसीचा घनकचरा प्रकल्प राबविण्यात नेमकी कोणी दिरंगाई केली, त्याला कोण जबाबदार आहे, घनकचरा प्रकल्पासंबंंधित सगळ््यांची एक बैठक घ्यावी, त्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही बोलवावे, या प्रकरणाची तपासणी करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना लवादाने सांगितले. (प्रतिनिधी)