शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या अवैध रेती उपशावर जिल्हा प्रशासनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 16:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्हयातील अवैध रेती उपसा करणाऱ्या वाळू माफीयांविरुद्ध ठाणे जिल्हा प्रशासनाने जोरदार मोहीम सुरु केली ...

ठळक मुद्दे रेतीच्या क्रेनसह दहा लाखांचा माल जप्त वाळूने भरलेला ट्रकही जप्तलोकमत इफेक्ट

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्हयातील अवैध रेती उपसा करणाऱ्या वाळू माफीयांविरुद्ध ठाणे जिल्हा प्रशासनाने जोरदार मोहीम सुरु केली आहे. कल्याण येथील रेती बंदरावर अनधिकृतपणे रेती उपसा करणाºया टोळीकडून रेतीने भरलेल्या ट्रकसह सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईमध्ये ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यात मोठया प्रमाणात विविध ठिकाणी अनधिकृतपणे रेती उपसा करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. दरम्यान ‘लोकमत’मध्येही यासदंर्भात ‘रेतीमाफियांच्या वाळू उपशामुळे कांदळवनावर आले गडांतर’ या मथळयाखाली ३० नोव्हेंबर रोजी वृत्त ‘रिअ‍ॅलिटी चेक’ द्वारे वृत्त प्रसिद्ध केले होते. याचीच गांभीर्याने दखल घेत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवरअपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या निर्देशानुसार कल्याण येथील रेतीबंदरावर ठाण्याचे रेतीगट तहसिलदार मुकेश पाटील आणि कल्याणचे तहसिलदार दीपक आकडे यांनी १२ डिसेेंबर २०२० रोजी आपल्या पथकासह कारवाई केली. या कारवाईमध्ये रेतीबंदरावर अनधिकृतपणे रेती उपसा करणारी सुमारे पाच लाख रुपये किंमतीची क्रेन, सुमारे दोन लाखांचा इंजिन पंप आणि अंदाजे दहा लाख रुपये किंमतीची ३० ब्रास रेती जागीच जप्त करण्यात आली. या कारवाईच्या वेळी रेतीने भरलेला ट्रकही जप्त केला असून या ट्रकच्या मालक आणि चालकाविरूध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती तहसीलदार मुकेश पाटील यांनी दिली.* वर्षभरात १२ ठिकाणी कारवाईरेती गट विभागासह तहसीलदार विभाग यांनी १ जानेवारी ते १४ डिसेंबरपर्यंत १२ ठिकाणी अवैद्य रेती उपशाबाबत कारवाई करीत पाच गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सक्शन पंप, बार्ज, बोटी आणि क्र ेन अशी कोटयवधींची यंत्रसामुग्री जप्त तसेच नष्ट केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.*अवैधरित्या होणाºया गौण खनिजाच्या उत्खननामुळे सरकारचा महसूलही मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. शिवाय खाडीतून वाळूचाही बेकायदा उपास केला जात असल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. वाळूच्या उपशासाठी कांदळवनाचा ºहास केला जातो. अशा कारवाईसाठी पथक खाडी पात्रात धडकल्यानंतर वाळू तस्कर आधीच पळून जातात. अनेक कारवाईमध्ये आरोपीचा काहीच थांगपत्ता लागत नाही. त्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी येथील खाडी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैद्य रेती उपसा सुरु असल्याबाबात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्र ारी प्राप्त झाल्या होत्या. त्याच तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करी