शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाकुर्ली स्थानकात रेल्वेचा वीज पुरवठा खंडीत, अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 20:33 IST

ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरला वीज पुरवठा करणा-या यंत्रणेत बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता घडली. बदलापूरला जाणारी गाडी घटनास्थळावर खोळंबली होती.

ठळक मुद्दे वीज पुरवठा करणा-या यंत्रणेत बिघाड अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प गाडीतील प्रवाशांचे सर्वाधिक हाल

डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरला वीज पुरवठा करणा-या यंत्रणेत बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता घडली. बदलापूरला जाणारी गाडी घटनास्थळावर खोळंबली होती. त्यामुळे त्या गाडीतील प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले. एक लोकल अडकली त्यापाठोपाठ मुंबईकडे तसेच कल्याणच्या दिशेने जाणारी जदल मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे आतोनात हाल झाले.या घटनेमुळे जलद मार्गावरुन घरी परतणा-या लाखो चाकरमान्यांचे हाल झाले. ठाणे ते दिवा मार्गावर जलदच्या डाऊन दिशेवर लोकल खोळंबल्या. अनेकांनी दिवा स्थानक गाठत धिमा मार्गावरुन पुढे जाण्यासाठी ट्रॅकमध्ये उतरण्याचा पर्याय निवडला. यामध्ये अनेक प्रवाशांचे हाल झाले. दिवा ते डोंबिवली गाठण्यासाठी धीम्या मार्गावरील प्रवाशांना पाऊण तास लागल्याची माहिती बदलापूरचे रहिवासी संजय मेस्त्री यांनी दिली. मेस्त्री हे बदलापूरला जाणा-या लोकलने प्रवास करत होते, त्यांची लोकल दिवा स्थानकात खोळंबली, त्यामुळे त्यांनी दिवा स्थानक गाठत धीम्या मार्गावरील लोकलने कल्याण गाठण्याचा प्रयत्न केला.मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनीही वीज पुरवठा करणा-या यंत्रणेत अचानक बिघाड झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. रात्री आठ वाजले तरी ठाकुर्लीत घटनास्थळी ओएचईसह विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु होते. अचानक जलदची गर्दी धीम्या मार्गावर आल्याने ठाणे ते डोंबिवली मार्गावरील धीम्या मार्गावरील फलाटांवर तुडुंब गर्दी झाली होती. या घटनेचा परिणाम धीम्या मार्गावरील वाहतूकीवर झाला. त्या गाडयांची वाहतूक देखिल पंधरा ते वीस मिनिटे विलंबाने धावली.सोशल मिडियावर विठ्ठलवाडी, कल्याण आदी स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती आल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. व्हॉट्सअ‍ॅपवर रेल्वेच्या जनसंपर्क अधिका-यांनी संदेश दिला. तसेच वस्तूस्थिती मांडली. दरम्यान, रात्री 8 च्या सुमारास डाऊन जलद मार्ग (कल्याणला जाणारा) सुरू झाला असून मुबंईकडे जाणार अप जलद मार्ग सुरू जाण्यासाठी सुमारे अर्धा तास जाणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल