शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर रिपाइंतील वाद चव्हाट्यावर, शहरजिल्हाध्यक्षांना डावलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 19:19 IST

उपमहापौर भगवान भालेराव बैठकीला नसल्याने, निवडणुकीपूर्वी पक्षातील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण.

ठळक मुद्देउपमहापौर भगवान भालेराव बैठकीला नसल्याने, निवडणुकीपूर्वी पक्षातील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका निवडणुकी पूर्वी निवड समितीची स्थापना करण्यासाठी रिपाइं आठवले गटाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष बी बी मोरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी बैठक झाली. मात्र शहरजिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव बैठकीला नसल्याने, निवडणुकीपूर्वी पक्षातील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली.

उल्हासनगरात रिपाइंची ताकद चांगल्या प्रमाणात असून महापालिकेत पक्षाचे ३ नगरसेवक आहेत. पक्षाचे शहराध्यक्ष व गटनेते भगवान भालेराव हे उपमहापौर असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम चालत असल्याचे चित्र शहरात आहे. महापालिकेच्या निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याने, पक्षाचे पदाधिकारी बी बी मोरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी बैठक होऊन, निवडणुकीपूर्वी निवड समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिका निवडणुकीत पक्षाचे १२ नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बी.बी.मोरे म्हणाले. तसेच निवड समितीस पक्षप्रमुख व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्याकडून मान्यता घेण्यात येईल. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 

प्रत्यक्षात पक्षाची जबाबदारी शहरजिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांच्याकडे दिल्याने, पक्ष प्रमुख आठवले निवड समितीला मान्यता देणार का? असा प्रश्न निर्माण झाला. तसेच पक्षातील वादावर काय निर्णय घेतात. याकडेही पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

शहर रिपाइंची जबाबदारी माझ्याकडे - भगवान भालेरावशहरात रिपाइंची ताकद वाढविण्याची जबाबदारी शहराध्यक्ष म्हणून पक्ष प्रमुख रामदास आठवले यांनी माझ्याकडे दिली. अशी प्रतिक्रिया भालेराव यांनी दिली. येत्या दोन दिवसात नव्या दमाची निवड समिती स्थापन करणार असून समितीला पक्षप्रमुख रामदास आठवले यांची मान्यता असणार आहे, असेही भालेराव म्हणाले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरElectionनिवडणूकRamdas Athawaleरामदास आठवले