शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उंबर्डेत कचरा टाकण्यावरून वाद: कल्याणमध्ये कचरागाडी चालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 01:37 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका अखेर पुरवणार पोलीस संरक्षण

डोंबिवली : कल्याण शहरातील वादग्रस्त आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी काही दिवसांपासून उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पात महापालिका हद्दीतील कचरा नेण्यात येत आहे. पण त्याला स्थानिकांनी विरोध करत कंत्राटी आणि ठोकपगारी कचरागाड्यांच्या चालकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने संबंधितांनी आम्हाला आधी सुरक्षा पुरवा आणि आरोग्यासाठी मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर द्या, या मागणीसाठी सोमवारी सकाळी आंदोलन केले. त्यामुळे शहरात कचरा साचल्याचे पाहायला मिळाले.

ठाकुर्लीनजीकच्या खंबाळपाडा डेपोमध्ये कचऱ्याच्या गाड्या बंद ठेऊन कंत्राटी वाहनचालकांनी मारहाणीचा निषेध केला. पंधरा दिवसांपासून उंबर्डे परिसरात कचºयाच्या गाड्या गेल्यावर तेथे वाहनचालकांना विरोध होत आहे. त्याबाबत महापालिकेच्या वरिष्ठांना सूचित केले आहे, परंतू तरीही कोणतीही सुरक्षा न देता गाड्या नेण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे आमच्या जीवाला धोका असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अखेरीस आंदोलन करून आधी आम्हाला सुरक्षा द्या अन्यथा कचरा उचलणार नाही, असा पवित्रा घ्यावा लागल्याची माहिती मच्छिंद्र तांदळे, सुरेश मिरकुटे, सुनिल कंद, शरद चाळके, ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली. तेथे सुमारे ४०० सफाई कामगार कार्यरत असून ३४० चालक असल्याचे ते म्हणाले. सुमारे १५० कचरा वेचक वाहने असून त्यात मोठी वाहने ७० असून अन्य घंटागाड्या आहेत.ओला-सुका कचरा वर्गीकरण करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी ही जबाबदारी पार पाडल्यास उंबर्डेत कमी प्रमाणात कचरा येईल. कामगारांनीही त्यांची जबाबदारी झटकून चालणार नाही. सोमवारी कामगारांना त्यांच्या जबाबदारीबद्दल समज देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षणही दिले जाईल. दरम्यान, दुपारपासून कचरा उचलण्याचे काम सुरू झाले आहे.- रामदास कोकरे, उपायुक्त, घनकचरा विघटन विभाग, कल्याण-डोंबिवली महापालिका

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाPoliceपोलिस