शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कचरा विल्हेवाटीचा निर्णय सर्वसहमतीनेच, पालकमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 03:47 IST

कचरा विल्हेवाटीसंदर्भात कोणताही निर्णय गृहसंकुलांवर लादला जाणार नाही. सर्वांच्या समस्या जाणून तसेच त्यांच्या सूचनांचा विचार करून सर्वसहमतीनेच निर्णय होईल, अशी ग्वाही ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे दिली.

ठाणे - कचरा विल्हेवाटीसंदर्भात कोणताही निर्णय गृहसंकुलांवर लादला जाणार नाही. सर्वांच्या समस्या जाणून तसेच त्यांच्या सूचनांचा विचार करून सर्वसहमतीनेच निर्णय होईल, अशी ग्वाही ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे दिली. ही समस्या मोठी असून, यातून मार्ग काढण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि गृहसंकुलांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक लवकरच घेतली जाईल. या बैठकीमध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, शासनाने डम्पिंग ग्राउंडला परवानगी न देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याने येथून पुढे मोकळ्या जागेवर कचरा न टाकता त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.कचऱ्याची विल्हेवाट गृहसंकुलांनीच लावण्याबाबतचे आदेश ठाणे महापालिकेने दिले होते. विल्हेवाट न लावणाºया गृहसंकुलांचा कचरा १५ जुलैपासून न उचलण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला होता. पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर या निर्णयाला सप्टेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या आदेशानुसार महापालिकेने गृहसंकुलांचा कचरा न उचलण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. रविवारी विविध गृहसंकुलांच्या कचरा विल्हेवाटीसंदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी गृहसंकुलांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. गृहसंकुलांच्या विनंतीनुसार डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या तळमजल्यावर आयोजित या बैठकीला दीडशेहून अधिक गृहसंकुलांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वसंत विहार अ‍ॅपेक्स कमिटी, हिरानंदानी इस्टेट रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन, हिरानंदानी मेडोज रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन, पीटीआरए, ठाणे हाउसिंग सोसायटीज फोरम, ठाणे सिटीझन फोरम, ब्रह्मांड अशा विविध गृहसंकुलांचे प्रतिनिधी आणि मनपा पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.जबाबदारी महापालिकेचीकचरा उचलणे आणि कचºयाची विल्हेवाट लावणे, ही महापालिकेची जबाबदारी असल्याचे मत याप्रसंगी गृहसंकुलांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.गृहसंकुलांकडे पुरेशी जागा नाही, निधी नाही आणि कचºयाची विल्हेवाट लावण्याचे कौशल्यदेखील नाही. प्रकल्प उभारल्यानंतर तो चालवण्याची आणि उद्या त्यात काही बिघाड झाला, तर ती जबाबदारी घेण्याची क्षमता गृहसंकुलांकडे नाही, असे अनेक मुद्दे याप्रसंगी मांडण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे