शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागात कचऱ्यावर विकेंद्रीत व शास्त्रोक्त पध्दतीने लावली जाणार विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 13:48 IST

ठाणे महापालिकेने आता प्रभाग समिती अंतर्गत कचऱ्यावर विकेंद्रीत व शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात सहा प्रभाग समितीअंतर्गत कंपोस्टींग पीट्स उभारण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देयेत्या महासभेत प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर५०० किलोक्षमतेचे उभारले जाणार पीट्स

ठाणे - शहरात निर्माण होणाऱ्या  कचऱ्यावर त्याच परिसरात विकेंद्रीत व शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नौपाडा, उथळसर, कळवा, मुंब्रा, वागळे आणि लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये कंम्पोस्टींग पीट्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सहा प्रभाग समितीमध्ये प्रत्येकी ५०० किलोक्षमतेचे हे पीट उभारले जाणार आहेत.           ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला ८०० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. हा कचरा दिवा येथील डम्पींगवर टाकला जात आहे. तसेच महापालिकेच्या वतीने मागील वर्षभरात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. काही प्रकल्प सुरु झाले असून काहींवर कार्यवाही सुरु आहे. याशिवाय प्रत्येक सोसायटीने आपला कचरा मार्गी लावावा यासाठी देखील पालिकेने पावले उचलली आहेत. यापुढे जाऊन प्रत्येक प्रभाग समिती मधील निर्माण होणारा कचरा हा त्याच ठिकाणी शास्त्रोक्तपध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार शहरात निर्माण होणाऱ्या  कचऱ्यावर त्याच परिसरात विकेंद्रीत व शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.त्यानुसार वागळे आणि लोकमान्य- सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत या पध्दतीनुसार ५०० किलो क्षमतेचे १० पीट व १ टन क्षमतेचे १५ पीट असे एकूण २५ केपोस्टींग पीट्स उभारले जाणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया देखील अंतिम झाली आहे. त्यानुसार या कामी एकूण २३ लाख ६९ हजार ४८६ रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. याच पध्दतीचे पीट्स कळवा, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत देखील उभारले जाणार असून त्यानुसार ५०० किलो क्षमतेचे ९ पीट व १ टनक्षमतेचे १० पीट असे एकूण १९ पीट्स उभारले जाणार आहेत. यासाठी १७ लाख ९ हजार ६४२ रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तर नौपाडा, उथळसर प्रभाग समितीमध्ये देखील ५०० किलो क्षमतेचे १० पीट व १ टनक्षमतेचे १५ पीट असे एकूण २५ कंपोस्टींग पीट्स उभारले जाणार आहेत. यासाठी २३ लाख २ हजार ३१० रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार हे तीन प्रस्ताव येत्या २० मार्चच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाdumpingकचरा