शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लोकायुक्तांच्या आदेशाचा अनादर; ठाणे काँग्रेसचा आरोप

By अजित मांडके | Updated: February 7, 2024 18:41 IST

आयुक्तांची भेट घेऊन पत्राद्वारे मागणी केलेली आहे, जर याबाबत योग्य भूमिका आयुक्तांनी घेतली नाही तर काँग्रेस रस्त्यांवर उतरून आंदोलन करेल असा इशारा त्यांनी शेवटी दिला.

ठाणे : लोकायुक्तानी दिलेल्या आदेशानंतरही अनधिकृत बांधकामावर कर आकारणी व पाणीपुरवठा करण्यात आला असून संबंधित जबाबदार अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी बुधवारी ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

ठाणे शहर काॅग्रेसच्या वतीने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी शहर काॅग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, जेष्ठ उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक, प्रवक्ते राहुल पिंगळे, महिला अध्यक्षा स्मिता वैती व मंजूर खत्री आदि पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना चव्हाण यांनी सांगितले अनधिकृत बांधकामावर आळा बसावा म्हणून लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली होती.

आमच्या या तक्रारींची दखल घेऊन लोकायुक्त यांनी महानगरपालिकेला आदेश दिले होते की,अनधिकृत बांधकामावर यापूढे पाणी पुरवठा, कर आकारणी तसेच वीजपुरवठा करण्यात येऊ नये परंतु लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशानंतरही मागील दोन वर्षांत झालेल्या सर्वच अनधिकृत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांना करआकारणी व पाणीपुरवठा करण्यात आलेला आहे. आताही नवीन आयुक्तांनी पून्हा एकदा याबाबत सर्व सहाय्यक आयुक्तांना आदेश दिले आहेत मात्र मागील दोन वर्षांत शेकडो अनधिकृत बांधकाम झालेल्या इमारतिंचा पाणीपुरवठा, करआकारणी करण्यात आली. याची पूर्ण चौकशी करण्यात यावी व याकाळात जे जे अधिकारी होते, त्यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी जर कोणी निवृत्त झाले असतील तर त्याची पेन्शन थांबविण्यात यावी अशी मागणी केली आहे. आयुक्तांची भेट घेऊन पत्राद्वारे मागणी केलेली आहे, जर याबाबत योग्य भूमिका आयुक्तांनी घेतली नाही तर काँग्रेस रस्त्यांवर उतरून आंदोलन करेल असा इशारा त्यांनी शेवटी दिला.