शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
3
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
4
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
5
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
6
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
9
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
10
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
11
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
12
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
13
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
14
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
15
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
16
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
17
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
18
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
20
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल

क्लस्टर योजनेतील सहा आराखड्यांना उच्चधिकारी समितीची मंजुरी, शासकीय जागेवरील घरे मालकी हक्काने देण्याबाबत झाली चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 17:15 IST

क्लस्टरच्या सहा विभागांचा बायोमेट्रीक सर्व्हे अद्याप सुरु झाला नसतांना, या सहा आराखड्यांना उच्चाधिकारी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे क्लस्टरच्या मार्गातील आणखी एक अडथळा दूर झाला आहे.

ठळक मुद्देशासकीय जागेवरील घरे मालकी हक्काने देण्यासाठी प्रयत्नदोन क्लस्टरमधील तलावांचेही होणार पुनर्जीवन

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या क्लस्टरच्या सहा बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने विस्तृत चर्चेअंती मान्यता दिल्याने क्लस्टर योजना अंमलबजावणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तसेच शासकीय जागेवरील घरे मालकी हक्काने उपलब्ध करुन देता येतील का? याविषयी सुध्दा चर्चा होऊन या जमीनीवरील घरे मालकी हक्काने देण्याबाबत राज्य शासनाला शिफारस करण्याचा निर्णयही घेण्यात आला.                  बुधवारी महापालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या या बैठकीत विविध मुलभूत विषयांवर विस्तृत चर्चा झाल्यानंतर सहाही आराखडयांना मजुरी देण्यात आली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, कोकण विभागाच्या नगर रचना विभागाचे सह संचलाक, वाहतूक पोलिस शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, म्हाडाचे कार्यकारी अभियंता आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी कोपरी, राबोडी, लोकमान्य नगर, किसननगर आणि टेकडी बंगला या सहा योजनांचे सादरीकरण करण्यात आले. ठाणे शहरासाठी क्लस्टर योजनेचे एकून ४४ आराखडे तयार करण्यात आले असून जवळपास १४८९ हेक्टर क्षेत्र या योजनेतंर्गत विकसित होणार आहे. तथापी कोपरी, रोबोडी, टेकडी बंगला, हाजुरी, किसन नगर आणि लोकमान्यनगर या एकूण ६ आराखड्यांच्या माध्यमातून एकून ३१६.६३ हेक्टर क्षेत्र विकसित करण्यात येणार असून त्यामध्ये ९३.१५ एवढे क्षेत्र रस्ते आणि आरक्षण म्हणून दर्शविण्यात आले आहे.                   दरम्यान बुधवारी झालेल्या या बैठकीमध्ये शासकीय जमिनींवरील घरे मालकी हक्काने उपलब्ध करून करून देता येतील का याविषयी चर्चा होवून या जमिनींवरील घरे मालकी हक्काने देण्याबाबत राज्य शासनाला शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर हाजुरी आणि राबोडी या दोन क्लस्टर आराखड्यांमधील तलावांचे पुनरूज्जीवन करण्यावर समितीच्या सर्व सदस्यांनी भर दिला. दरम्यान सद्यस्थितीत अस्तित्वातील जमीनीचा वापर, अस्तित्वातील सुविधा आणि क्लस्टरमध्ये करण्यात आलेल्या तरतुदी प्रस्तावित करण्यात आलेल्या सुविधा यावर सदस्यांनी विस्तृत चर्चा करून मंजुर विकास योजनेमध्ये जे ना विकास क्षेत्र किवा आरक्षित क्षेत्र आहे ते मोकळे ठेवण्याबाबत काळजी घेण्याविषयी सूचना केल्या. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त