शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘मागासवर्गीय असल्यानेच भेदभाव’, भाजपा नगरसेविकेचा शिवसेना महापौरावर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:45 IST

मागासवर्गीय नगरसेविका असल्याने शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर भेदभाव करून पाण्याची समस्या सोडवत नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप भाजप नगरसेविका खंडागळे यांनी केला आहे.

कल्याण : मागासवर्गीय नगरसेविका असल्याने शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर भेदभाव करून पाण्याची समस्या सोडवत नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप भाजप नगरसेविका खंडागळे यांनी केला आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या भाजपा नगरसेविका सुनीता खंडागळे यांच्या प्रभागात गेल्या अडीच वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या आहे. संतप्त महिलांनी सोमवारी दुपारी १२ वाजता महापालिका मुख्यालयात धाव घेतली. स्थायी समितीकडून महासभेत अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याने सुरक्षारक्षकांनी संतप्त महिलांना आत सोडले नाही. या महिलांच्या शिष्टमंडळास घेऊन खंडागळे यांनी प्रशासनाची भेट घेतली असता १५ दिवसांत पिसवली गोळवलीतील पाणीसमस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. वारंवार पाठपुरावा करूनदेखील प्रशासन दाद देत नाही.२०१५ मध्ये महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पिसवली-गोळवली प्रभाग क्रमांक ८६ मधून भाजपातर्फे खंडागळे या निवडून आल्या. पिसवली-गोळवली हा परिसर २७ गावांत होता. ही गावे महापालिकेत आली, तर त्यागावची पाणीपुरवठ्याची व्यवस्था एमआयडीसीकडे आहे. त्याचे बिल महापालिका भरते. महापालिका महिन्याला एक कोटीप्रमाणे वर्षाकाठी १२ कोटींचे बिल भरते. एमआयडीसीकडून पुरेसा पाणीपुरवठाच केला जात नाही. त्यामुळे पिसवली-गोळवली परिसराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. निवडून आल्यापासून सातत्याने पाणीपुरवठ्यासाठी खंडागळे या पाठपुरावा करतात. एकदा मोर्चा काढला होता. त्याचबरोबर महापालिकेत धाव घेतली होती. आता तीव्र उन्हाळा सुरू झाला. त्यात आठवड्यात शुक्रवारी औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा बंद असतो. याशिवाय, सात टक्के पाणीकपात लागू झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आठवड्यातील पाच दिवस पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. हा पाणीपुरवठा दोन दिवसही होत नाही.पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी रविवार, २५ मार्च रोजी रात्री १२ वाजता नगरसेविका खंडागळे यांच्या घरावर धाव घेतली. या वेळी संतप्त नागरिकांनी खंडागळे यांच्या घराचे प्रवेशद्वारच तोडून आत प्रवेश केला. नागरिकांनी त्यांचा रोष व्यक्त केला. या सगळ्यांना शांत करून नागरिकांनी पाण्यासाठी महापालिका मुख्यालयात यावे, असे आवाहन खंडागळे यांनी रविवारी रात्री केले.अडीच वर्षे पाठपुरावा करून ही समस्या सुटत नसल्याने खंडागळे यांनी महापौर देवळेकर यांच्यावर निशाणा साधला. मागासवर्गीय असल्याने जाणीवपूर्वक पाण्याचा प्रश्न लटकवून ठेवल्याचे खंडागळे यांचे म्हणणे आहे. भाजपाचे उपमहापौर मोरेश्वर भोईर आणि गटनेते वरुण पाटील यांनीही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांच्याही प्रयत्नांना यश आले नाही.