शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

थकबाकीदांराचा वीजपुरवठा खंडित करा; अंकुश नाळे यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 17:15 IST

महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात दरमहा दिले जाणारे वीजबिल वसुलीचे निर्धारीत उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष वसुली यात लक्षणीय फरक राहत आहे.

डोंबिवली: महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात दरमहा दिले जाणारे वीजबिल वसुलीचे निर्धारीत उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष वसुली यात लक्षणीय फरक राहत आहे. परिणामी आर्थिक वर्षाच्या शेवटी थकबाकीच्या रकमेत होणारी वाढ महावितणच्या एकूण आर्थिक परिस्थितीला मारक ठरेल. त्यामुळे दरमहाच्या वसुलीचे लक्ष्य त्याच महिन्यात शंभर टक्के पुर्ण करण्यासोबतच थकबाकीदारांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करा, असे स्पष्ट निर्देश कोकण विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

प्रभारी प्रादेशिक संचालक  नाळे यांनी कोकण विभागातील कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचे मुख्य अभियंता, सर्व अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंते यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत हे निर्देश दिले.

महावितरणच्या एकूण महसुलात जवळपास ४० टक्क्यांपेक्षा अधिक योगदान देणाऱ्या कोकण विभागाच्या वसुलीत दरमहा राहणारी तफावत महावितरणच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करणारा आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून थकबाकी वसुली मोहिमेला गती देत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करावे. शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह सर्व वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे निर्देश त्यांनी  दिले

कोकण प्रादेशिक विभागातून फेब्रुवारी-२०२० या महिन्यात वीजबिलाचे २३१७.४७ कोटी रुपये वसूल होणे आवश्यक आहे. मात्र २७ फेब्रुवारीपर्यंत यातील २०५७.८३ कोटी रुपयेच वसूल होऊ शकले. याशिवाय एप्रिल २०१९ पासूनचे ३७० कोटी आणि चालू विजबिलाची उर्वरित रक्कम वसूल होणे अद्याप बाकी आहे. वसुली मोहिमेला गती देऊन ही रक्कम वसूल करण्याचे निर्देश नाळे यांनी दिले आहेत.

तसेच मुख्य कार्यालयाकडून दरमहा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत देण्यात येणाऱ्या यादीतील ग्राहकांची वीज दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत खंडित करण्याचे आदेश त्यांनी दिले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष ठेऊन या कारवाया नियमानुसार व वेळेत पूर्ण करण्यासोबत पडताळणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. या बैठकीला मुख्य अभियंते सर्वश्री दिनेश अग्रवाल, ब्रिजपालसिंह जनवीर, दीपक कुमठेकर, श्रीमती पुष्पा चव्हाण व रंजना पगारे यांच्यासह कोकण प्रादेशिक विभागातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते उपस्थित होते.सहकार्य करून संभाव्य गैरसोय टाळा

थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर पुन:र्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पुर्ववत‍ केला जात नाही. त्यामुळे कोकण प्रादेशिक विभागातील ग्राहकांना थकबाकी व चालू वीजबिल भरून सहकार्य करावे व संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन नाळे यांनी केले आहे.

टॅग्स :electricityवीजdombivaliडोंबिवलीMaharashtraमहाराष्ट्रmahavitaranमहावितरण