शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी काँग्रेस तसेच कोणार्क आघाडीत थेट लढत; आज निवडणूक, घोडेबाजार जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 02:45 IST

भिवंडी महानगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी दुपारी १२ वाजता निवडणूक पार पडणार आहे.

- नितीन पंडितभिवंडी : भिवंडी महानगरपालिकेत कोणार्क विकास आघाडीकडून काँग्रेसला सुरुंग लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून, त्यामुळे काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असतानाही महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. गुरुवार, ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि कोणार्कमध्ये थेट लढत असून, त्यामुळे घोडेबाजारही जोरात सुरू आहे.भिवंडी महानगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी दुपारी १२ वाजता निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महापौरपदासाठी काँग्रेसच्या रिषिका पप्पू राका, वैशाली मनोज म्हात्रे, कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा विलास पाटील, तर शिवसेनेच्या वंदना मनोज काटेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसने रिषिका राका यांना मतदान करण्यासाठी पक्षाच्या नगरसेवकांना व्हिप जारी केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वैशाली म्हात्रे यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. शिवसेनेकडे फक्त १२ नगरसेवक असल्याने वंदना काटेकर यांचा महापौरपदावरचा दावा धूसर झाला आहे. त्यामुळे महापौरपदासाठी काँग्रेसच्या रिषिका राका व कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांच्यातच थेट लढत होणार आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे काही नगरसेवक कोणार्क विकास आघाडीच्या तंबूत दाखल झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कोणार्क विकास आघाडीकडून काँग्रेसच्या एका गटाला उपमहापौरपद देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त असून, या पदासाठी इम्रान वली मो. खान हे दावेदार मानले जात आहेत. मात्र, काँग्रेस पक्षश्रेष्ठी कोणार्कच्या गोटात गेलेल्या काँग्रेस नगरसेवकांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले तर, महापौरपदी काँग्रेसच्या रिषिका राका आणि उपमहापौरपदी मुख्तारमोहंमद अली खान यांची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.पालिका निवडणुकीत कोणार्क विकास आघाडी आणि भाजपमध्ये युती झाली होती. युतीधर्म पाळत भाजपने यावेळी कोणार्क विकास आघाडीच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. महापालिकेत काँग्रेस व शिवसेना आघाडीची सत्ता आहे. महापालिकेत ९० नगरसेवक असून, त्यामध्ये काँग्रेसचे ४७, शिवसेना १२, भाजप २०, कोणार्क विकास आघाडी ४, समाजवादी पार्टी २, आरपीआय (एकतावादी) ४ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे.महापौर निवडणूक असल्याने पालिकेच्या प्रवेशद्वारावर खासगी बसमधून येणाºया नगरसेवकांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. नगरसेविकांच्या बदल्यात त्यांचे पतीराज पंचतारांकित हॉटेलमध्ये मौजमजा करून निवडणुकीत तोरा मिरवत असल्याचेही यानिमित्ताने दिसत आहे.घोडेबाजारामुळे वाढली चुरसमहापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याने भिवंडीत नगरसेवकांचा घोडेबाजार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्याला लगाम घालण्यासाठी शासनाने सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे मत राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केले जात आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेदेखील आपला ३० नगरसेवकांचा गट नाशिकच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, भिवंडी महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता असूनही अडीच वर्षांपूर्वी काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेतले होते.काँग्रेसने उपमहापौरपदाची माळ सेनेच्या गळ्यात घातली होती. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या काँग्रेसची बाजू मजबूत आहे. मात्र, घोडेबाजार मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाल्याचे दिसत आहे.राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. ते समीकरणही भिवंडी महानगरपालिकेच्या या निवडणुकीत जुळवून आणण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी