शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी शिवसेनेच्या दीपाली पाटील बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 19:07 IST

  जिल्हा परिषदेवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची सत्ता आहे. जाधव यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ही जागा रिक्त होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पद अनुसूचित जमातीच्या (एसटी) महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या सभेत पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैधएकच अर्ज आलेला असल्यामुळे मतदानाचा प्रसंग आला नाहीअध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार इच्छुक होते.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील यांना ग्रीन सिग्नल

ठाणे : जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या रिक्त जागी शिवसेनेच्या दीपाली दिलीप पाटील यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. भिवंडी तालुक्यातील वापे येथील त्या रहिवाशी आहे. माजी अध्यक्षा मंजुषा जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या अध्यक्ष पदी पाटील यांची बिनविरोध निवड केल्याचे शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी लोकमतला सांगितले.        जिल्हा परिषदेवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची सत्ता आहे. जाधव यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ही जागा रिक्त होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पद अनुसूचित जमातीच्या (एसटी) महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या आरक्षणास पात्र असलेल्या दीपाली पाटील यांच्या उमेदवारी विरोधात अन्य कोणाचाही अर्ज दाखल न झाल्यामुळे दुपारी ३ वा. घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवून माघार घेण्याची मुदतही दिली. मात्र माघार न घेतल्यामुळे उपस्थित सर्व सदस्यांच्या समक्ष पाटील यांचा एक अर्ज शिल्लक असल्याचे स्पष्ट करून त्या बिनविरोध निवडून असल्याचे घोषीत करण्यात आले, असे ठाणे उपविभागीय अधिकारी तथा विशेष सभेचे अध्यक्ष आणि निवडणुकीचे पिठासन अधिकारी अविनाश शिंदे यांनी लोकमतला सांगितले.        अध्यक्ष पदाच्या या निवडीस अनुसरून घेतलेल्या या विशेष सभेला ठाणे जिल्हा परिषदेचे ४८ सदस्ये व तीन सभापती आदी ५३ सदस्य या सभेला उपस्थित होते. याशिवाय पंचायत समितीचे तीन सभापती या अध्यक्ष पदाच्या निवड सभेला उपस्थित होते. मात्र एकच अर्ज आलेला असल्यामुळे मतदानाचा प्रसंग आला नाही आणि पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असेही शिंदे यांनी निदर्शनात आणून दिले. या निवडीनंतर अध्यक्षा पाटील यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर जाऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत पुढी कामकाजासाठी आशिर्वाद घेतला. यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या दालनात शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या समक्ष जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दीपाली पाटील यांना अध्यक्ष पदाची खुर्ची सन्मानपूर्वक बहाल केली.        आगामी विधान सभेची निवडणूक लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे सर्वाधिक सदस्य असलेल्या शिवसेनेने या जिल्हा परिषदच्या सत्तेत राष्ट्रवादीला उपाध्यक्ष पदासह सभापती पद आधीच दिलेले आहे. याशिवाय भाजपाला काही काळ सत्तेबाहेर ठेवले होते. त्यातील एका सदस्यास सभापती पद देऊन भाजपालाही आधीच सत्तेत सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत विरोधी पक्षच उरलेला नसल्यामुळे सेनेच्या पाटील यांची बिनविरोध निवड होणे शक्य झाले आहे. यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पाटील यांनी नियोजन करून अध्यक्ष पदाची ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे. या अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार इच्छुक होते. मात्र शिंदे यांनी पाटील यांच्या नावास ग्रीन सिग्नल देत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याविरोधात अन्य कोणत्याही सदस्याने उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याचे प्रकाश पाटील यांनी लोकमतला सांगितले. 

 

 

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद