शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांसाठी खूशखबर! बारवी, आंध्रा, मोडकसागर भरले, भातसा, तानसा भरण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 06:52 IST

भातसा, तानसा आणि मध्य वैतरणा भरण्याच्या उंबरठ्यावर होते.

ठाणे : चार दिवसांपासून जिल्ह्यातील सातही तालुक्यांत पावसाची रिपरिप सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या लाभक्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे पाणीकपातीची चिंता काहीअंशी कमी झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी ठाणे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणासह आंध्रा, मोडकसागर १०० टक्के भरले होते. याशिवाय भातसा, तानसा आणि मध्य वैतरणा भरण्याच्या उंबरठ्यावर होते.गेल्या वर्षी सर्व धरणे आॅगस्ट महिना संपण्याआधी भरली होती. यंदा पाऊस लांबणीवर पडल्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र, दरम्यानच्या काळात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बारवी धरणासह भातसा, आंध्रा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीच्या बारवी धरण क्षेत्रात २४ तासांत सरासरी ७१.५० मिमी पाऊस पडला आहे. यापैकी बारवी धरणात ३२ मिमी, खानिवरे ११६, कान्होळ ३७, पाटगाव ८३ आणि ठाकूरवाडीच्या लाभक्षेत्रात ५० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. आता या धरणाची पाणीपातळी ६८.९६ मीटर झाली आहे.या धरणात आणखी ३.६४ मीटर पाणीसाठा होणे अपेक्षित आहे. तूर्तास या धरणात ७१.२२ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी याचवेळी तो १००.११ टक्के होताबारवी धरणात ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा यंदा करण्यात येणार आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून साडेतीन मीटर पाणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर, या पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. बारवीप्रमाणेच भातसा धरणात ८०.८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. रविवारी या धरणक्षेत्रात ३८ मिमी पाऊसपडला.आंध्र धरणात यंदा प्रथमच रविवारी ८१ मिमी पाऊस पडला. आता या धरणात ५२.५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. मोडकसागरमध्ये ५१ मिमी पाऊस पडला. आता या धरणात ९०.६३ टक्के साठा आहे. तानसात २१ मिमी पाऊस पडला असून आता धरणात ७९ टक्के पाणीसाठा तयार झाला. मध्य वैतरणात रविवारी ५० मिमी पाऊस पडून, धरणात ८२ टक्के पाणीसाठा संकलित झाला आहे.>जिल्ह्यात रविवारी सरासरी २३ मिमी पाऊस पडला. यापैकी कल्याणला ३१, मुरबाडला २०, भिवंडीला १३, शहापूरला ४६, उल्हासनगरला २९ आणि अंबरनाथला १२ मिमी पाऊस पडला आहे.