शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

दिघे यांच्या आठवणीत रंगला 'धर्मवीर'च्या ट्रेलर लाँचचा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 05:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आनंद दिघे आणि माझ्यात काही साम्ये आहेत असे मला आज या कार्यक्रमात सगळे सांगत ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आनंद दिघे आणि माझ्यात काही साम्ये आहेत असे मला आज या कार्यक्रमात सगळे सांगत आहेत. मला त्यांच्यावर केलेल्या चित्रपटाचा हा ट्रेलर भरपूर आवडला...अशा शब्दात अभिनेता सलमान खान त्याच्या खास अंदाजात 'धर्मवीर'च्या ट्रेलर लॉंचचा सोहळ्यात व्यक्त झाला. त्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलमान रील लाईफमधील दबंग आहे, तर दिघे रिअल लाईफमधील दबंग होते, अशी त्यांच्या शैलीत दाद दिली.

शिवसैनिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आनंद दिघे यांच्यावरील १३ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'धर्मवीर'च्या ट्रेलर लॉंचचा सोहळा ताज लँड्स एन्ड येथे झाला. त्यास रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, अरुणाताई दिघे, अब्दुल सत्तार, दादा भुसे, बच्चू कडू, मिलिंद नार्वेकर, सुनील शिंदे, अभिनेता रितेश देशमुख, शर्मन जोशी, अमिषा पटेल, गुलशन ग्रोव्हर, प्रीती झंगियानी, दिव्या दत्ता, सुशांत शेलार, कश्मिरा शाह, मंगेश देसाई, प्रवीण तरडे, श्रुती मराठे यांच्यासह विविध मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते.

आनंद दिघे यांच्यासारखा कट्टर कार्यकर्ता पुन्हा होणार नाही असे म्हणत बाळासाहेबांच्या शैलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, शाब्बास नाव राखलंत, निष्ठा राखलीत... गुरू-शिष्याचं नातं जपणारा शिवसेना हा जगातील एकमेव पक्ष आहे. अनेकांनी शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना संपवून शिवसेना पुढे गेल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. बाळासाहेबांप्रमाणे ठाण्यात कडवे शिवसैनिक घडवून शिवसेना मजबूत करणाऱ्या आनंद दिघे यांना जनतेने धर्मवीर ही पदवी दिली. ५० वर्षांच्या जीवनात दिघे १०० वर्षे जगले. त्यांनी शिवसेनाप्रमुखांकडे काहीही मागितले नाही. फक्त निष्ठा कायम ठेवली, असे गौरवोद्गार ठाकरे यांनी काढले. एकनाथ शिंदे यांनी या विषयावर सिनेमा काढून मोठे काम केल्याचे कौतुकही ठाकरे यांनी केले.

प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. तर निर्मिती मंगेश देसाई आणि झी स्टुडिओज यांनी केली असून, लेखन-दिग्दर्शन प्रवीण तरडेने केले आहे.

जीवन जगण्याची प्रेरणा - शिंदेदिघेसाहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन धर्मवीर बनविल्याचे एकनाथ शिंदे या सोहळ्यात म्हणाले. दिघे यांच्या समांतर न्याय व्यवस्थेने अनेकांना केवळ न्यायचं नव्हे, तर जीवन जगण्याची प्रेरणा दिल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना