शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात विसर्जन मिरवणुकीत अनेक ठिकाणी डिजेचा दणदणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 15:46 IST

पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देतांना ठाण्यात विविध ठिकाणी आवाजाची पातळी ही १०० डेसीबल पर्यंत गेल्याचे दिसून आले आहे. तर अनेक ठिकाणी डिजे दणदणाट झाल्याचे दिसले आहे.

ठळक मुद्देआवाजाच्या पातळीने ओलांडली मर्यादा१०० डेसीबलपर्यंत पोहचला आवाज

ठाणे - गणपती विसर्जन मिरवणुकीत उच्च न्यायालयाने डीजे वाजविण्यास बंदी घातली आहे. असे असले तरी ठाण्यात विविध ठिकाणी पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देतांना डिजेचा दणदणाट झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी केला आहे. अनेक ठिकाणी ध्वनीची मर्यादा डेसीबल पेक्षाही अधिक पटीने असल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी ढोलताशा, फटाक्यांची आतषबाजी आणि डिजेचा दणदणाट झाला होता. त्यामुळे हाच दणदणाट आता १० दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीतही वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.                  उच्च न्यायालयाने विसर्जन मिरवणुकीत डिजे वाजवू नये असे स्पष्ट केले आहे. या संदर्भातील पुढील निकाल १९ सप्टेंबर रोजी लागणार आहे. असे असतांना सुध्दा ठाण्यात डिजेचा दणदणाट होणार हे मनसे आणि राष्ट्रवादीने स्पष्ट केले होते. त्यानुसार पाच दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत डिजेचा दणदणाट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.                     पाच दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे सोबत ढोलताशा, अम्प्लेफायरस आदींच्या वाद्यांचा दणदणाट दिसून आल्याचे बेडेकर यांनी सांगितले. यावेळी बेडेकर यांनी शहरातील १० ठिकाणच्या ध्वनीची पातळी तपासली असता, राम मारुती रोड येथे रात्री ८.२० च्या सुमारास ९० ते ९५ डेसीबल, गोखले रोड ९५ ते १०० डेसीबल, मल्हार सिनेमा ९०, बाफना सर्जिकल सर्व्हीस रोड ८५ ते ९०, वर्तक नगर ९० ते ९५, लक्ष्मी नारायण रेसिडेन्सी ८५ ते ९० शास्त्री नगर ९५ ते १००, टीएमसी निपुण हॉस्पीटल ८५ ते ९०, पाचपाखांडी ९५ आणि देवधर हॉस्पीटल गोखले रोड येथेही आवाजाची पातळी ही १०० डेसीबल पर्यंत गेल्याचे दिसून आले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाGanpati Festivalगणेशोत्सव