शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

धारण करतो तो धर्म, विभक्त करणारा धर्म नाही - धनश्री लेले यांचे मत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 12:49 IST

ठाण्यात सुरु असलेल्या सुयश कला-क्रीडा मंडळ आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प धनश्री लेले यांनी गुंफले. 

ठळक मुद्देदुर्दैवाने धर्म या शब्दाचा खरा अर्थ कळणारी माणसे राजकारणाकडे वळत नाहीत - धनश्री लेलेव्याख्यानमालेचे दुसरे पुष्प धनश्री लेले यांनी गुंफलेज्ञानेश्वरांचे साहित्य आजच्या काळातही महत्वाचे व तितकेच उपयुक्त - धनश्री लेले

ठाणे : हल्ली 'धर्म' हा शब्द उच्चारणे भीतीदायक झाले आहे. धर्म याचा खरा अर्थ धर मग म्हणजेच समाजाला धर, एकत्र कर असा आहे. जो धरतो, धारण करतो तो धर्म. विभक्त करतो तो धर्म नाही. मात्र दुर्दैवाने धर्म या शब्दाचा खरा अर्थ कळणारी माणसे राजकारणाकडे वळत नाहीत. ज्यांना धर्म या शब्दाचा अर्थ माहिती नाही अशी माणसे राजकरणात असल्याने देश विघाताकडे वळत असल्याचे मत निरुपणकार धनश्री लेले यांनी पसायदानातील 'विश्व स्वधर्म सूर्ये पाहो' या पंक्तीचा अर्थ सांगताना व्यक्त केले.   

सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित  पंधराव्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प निवेदिका धनश्री लेले यांच्या पसायदान काल व आज यावरील व्याख्यानाने श्री सिद्धिविनायक मंदिराचे पटांगण येथे गुंफण्यात आले. पसायदानात विश्वाने स्वधर्माचा सूर्य पाहावा, म्हणजेच प्रकाश पाहावा असे म्हंटले आहे. मात्र स्वधर्म म्हणजेच स्वकर्म. प्रत्येकाने आपले काम शंभर टक्के पूर्ण करावे म्हणजे स्वधर्म. स्वकर्म न करणाऱ्यांना स्वधर्मविषयी बोलणायचा अधिकार नाही असे पुढे त्या म्हणाल्या. पसायदान हे एक प्रकारचे मागणे आहे. मात्र हे मागणे त्याच्याकडेच मागावे जो देऊ शकतॊ. देणारा तो देव, त्याच्याकडे हे मागणे असल्याचे लेले म्हणाल्या. पसायदानातील प्रत्येक ओळीचा व त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ लेले यांनी उलगडून दाखविला. ज्ञानेश्वर माउलींनी प्रत्येक शब्द किती जाणीवपूर्वक वापरला असल्याचे यातून प्रतीत होत होते. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भू मंडळी भेट तू भुता या ओळीचा भावार्थ सांगताना ईश्वरनिष्ठ, चांगली, बुद्धीमानी मंडळी एकमेकांना भेटली पाहिजेत असे यात सांगितले आहे. परंतु असे होत नाही. भारत स्वतंत्र झाल्यावर अतिशिक्षित व उच्च विद्याविभूषित मंडळी समाजापासून तुटतात अशी खंत महात्मा गांधी यांनी व्यक्त केल्याचे लेले यांनी यावेळी सांगितले. यावरूनच  ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात सांगितलेल्या गोष्टी आजही सांगितल्या जात असून त्यांचे साहित्य आजच्या काळातही महत्वाचे व तितकेच उपयुक्त असल्याचे शेवटी धनश्री लेले यांनी नमूद केले. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई