शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव- २०१८ ठाण्यात संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 17:05 IST

ठाण्यात आज हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव- २०१८ संपन्न झाला. यावेळी ठाणे जिल्ह्यातील शाळा सहभागी झाल्या होत्या.

ठळक मुद्देहिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव ठाणे जिल्ह्यातील शाळा सहभागी दहीहंडी फोडण्याचा मान महापालिकेच्या जिद्द शाळेला

ठाणे : बाळ गोपाळ मित्र मंडळ सह नारळवाला चाळ, ठाणे व पुनर्जीवन सामाजिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यंदाही हिंदुहृदयसम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव-२०१८ चे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात हा महोत्सव संपन्न झाला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी अवयवदानाची ही दहीहंडी फोडून उत्सवाचा आनंद साजरा केला.कार्यक्रमाला पितांबरीचे रविंद्र प्रभुदेसाई, ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेश मढवी, विनायक जोशी, विलास जोशी आणि आयोजक विलास ढमाले उपस्थित होते. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी पूजन करण्यात आले व ही दहीहंडी फोडण्याचा मान महापालिकेच्या जिद्द शाळेला देण्यात आला. यावेळी अस्तित्व मतीमंद व मुकबधीर मुलांची शाळा, डोंबिवली, कमालिनी कर्णबधीर विद्यालय, ठाणे, झवेरी ठाणावाला, ठाणे, जिव्हाळा मुकबधीर शाळा, ठाणे, हॉलीक्रॉस शाळा, ठाणे या शाळांतील विद्यार्थ्यांनीही दहीहंडी फोडली. यावेळी मुलांनी ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘बोल बजरंग बली की जय म्हणत’ उत्साहाने मानवी मनोरे रचत हंडी फोडली. या मुलांपैकी कोणी राधाच्या तर कोणी कृष्णाच्या वेशभूषेत आले होते. त्यांची वेशभूषा बघ्यांची लक्ष वेधून घेत होती. समस्त ठाणेकरांनी या सर्व बाळगोपाळांचे कौतुक केले. त्यानंतर गरजूंना वह्या व औषधे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित पालक आणि नागरिकांना अवयवदानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक