शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

रुंदे गावात साकारतेय देवराई, ५० एकर जागा, २५ हजार झाडे लावण्याचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 03:35 IST

कल्याण तालुक्यातील रुंदे गावानजीक ५० एकर जागेवर पर्यावरण दक्षता मंच, एनव्हायरो आणि वन विभाग यांच्यातर्फे ‘देवराई’ हा प्रकल्प आकारास येत आहे. सध्या सात हजार झाडे लावून या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. सात वर्षांत २५ हजार वृक्ष वाढवून वनराई व वन्यजीव वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

जान्हवी मोर्येडोंबिवली : कल्याण तालुक्यातील रुंदे गावानजीक ५० एकर जागेवर पर्यावरण दक्षता मंच, एनव्हायरो आणि वन विभाग यांच्यातर्फे ‘देवराई’ हा प्रकल्प आकारास येत आहे. सध्या सात हजार झाडे लावून या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. सात वर्षांत २५ हजार वृक्ष वाढवून वनराई व वन्यजीव वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.‘देवराई’च्या प्रकल्प अधिकारी संगीता जोशी म्हणाल्या की, ‘रुंदे गावात पर्यावरण दक्षता मंच आणि वन विभागाने जूनमध्ये वृक्षरोपणास सुरुवात केली. या प्रकल्पाला एनव्हायरो संस्था निधी देणार आहे. तर प्रकल्पासाठी ५० एकर जागा वन विभागाने दिली आहे.त्यापैकी १० एकर जागेवर पावसाळ््यात सात हजार झाडे लावली आहेत. त्यात आवळा, आंबा, आपटा, हिरडा, कांचन, खैर, वड, पिंपळ, काटेसावर अशी १०० जातीची झाडे आहेत. या प्रकल्पातून वनीकरण वाढविण्याचा उद्देश आहे. रुंदेनजीकची काळू नदी आटते. तसेच या परिसरात जमिनीची धूप थांबवणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. या प्रकल्पासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. वन्यजीव साखळी वनीकरण वाढल्यावर वाढीस लागेल.’पर्यावरण दक्षता मंचाच्या रुपाली शाईवाले म्हणाल्या की, ‘देवराई प्रकल्पासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, रोटरी क्लब यांचे सहकार्य घेतले आहे.जमिनीची पोत तसेच येथे कोणती झाडे रुजतील, याची माहिती वनस्पतीशास्त्र तज्ज्ञांकडून घेतली. रोपांकरता विकसित केलेल्या नर्सरीत जवळपास १२ हजार रोपे लावली. त्यापैकी सात हजार रोपांची लागवड केली आहे. सात वर्षांत ५० एकर जागेवर २५ हजार झाडे वाढवण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे येथे देवराई बहरणार आहे.’वन्यजीवही वाढणारपर्यावरण दक्षता मंचाने प्रथमच वनीकरणाच्या प्रकल्पात सहभाग घेतला आहे. जानेवारीपासून पावसाळ््यापूर्वी जमिनीतील तण काढणे, खड्डे खोदणे याचे काम केले. पाऊस चांगल्याप्रकारे सुरू झाल्यावर झाडे लावली. खत व पाणी देण्याचे काम कर्मचारी व स्वयंसेवक करणार आहेत.प्रकल्प राबवण्यापूर्वी केलेल्या पाहणीत रुंदे येथे मंचाला मोराचे वास्तव्य, सापाची कात, कासवाची अंडी आढळली. भारतातील अनेक वन्यजीव व वनस्पतीच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वन्यजीव वाढीस लागून जंगल वाढावे, हाच देवराई प्रकल्पामागील हेतू आहे, असे शाईवाले म्हणाल्या.