शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

स्वत:च्याच कर्मचाऱ्याला ठरवले ‘अनोळखी’; मीरा रोड रेल्वे पोलिसांचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 23:50 IST

मीरा रोड रेल्वेस्थानकाच्या हद्दीत शनिवारी रेल्वेत खलाशाचे काम करणा-या चेतन मुरलीधर मोटवानी (३३) यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्याला अनोळखी दाखवल्याने त्याचा मृतदेह नातेवाइकांना ताब्यात देण्यास रविवार उजाडला.

भाईदर : मीरा रोड रेल्वेस्थानकाच्या हद्दीत शनिवारी रेल्वेत खलाशाचे काम करणा-या चेतन मुरलीधर मोटवानी (३३) यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्याला अनोळखी दाखवल्याने त्याचा मृतदेह नातेवाइकांना ताब्यात देण्यास रविवार उजाडला. रेल्वे कर्मचा-याला अनोळखी ठरवणाºया पोलिसांच्या बेदरकार कारभाराविरोधात मृताच्या नातेवाइकांत तीव्र संताप व्यक्त केला आहे.वसई रेल्वे क्वार्टर्समध्ये राहणारा चेतन हा पश्चिम रेल्वेत २०१० मध्ये खलाशीपदावर रुजू झाला होता. तत्पूर्वी त्याचे वडील चर्चगेट येथील कार्यालयात शिपाई होते. त्यांचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर चेतनला रेल्वे प्रशासनाने नोकरी दिली होती. शनिवारी तो वसईहून बोरिवली येथे चर्चगेट लोकलने कार्यालयीन कामासाठी जात असताना दुपारी ३ वाजताच्या सुमारास मीरा रोड ते दहिसरदरम्यान धावत्या लोकलमधून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मीरा रोड रेल्वे पोलिसांनी चेतनचा मृतदेह रेल्वेस्थानकात आणला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ पश्चिम रेल्वेचे ओळखपत्र आढळून आले. यानंतर, पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. हे सोपस्कार पार पाडूनही पोलिसांनी त्याच्या शवविच्छेदनपूर्व अर्जात चेतन अनोळखी असल्याची नोंद केली.दरम्यान, चेतनची आई धन्वंतरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता मीरा रोड रेल्वे पोलीस चौकीत दाखल झाली. यानंतर, तब्बल तीन तासांनंतर चेतनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भार्इंदर पश्चिमेकडील भारतरत्न स्व. पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदन केंद्रात २४ तास डॉक्टरांना उपस्थित राहण्याचे निर्देश असतानाही ते उपस्थित नसल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. रात्री ८ वाजेपर्यंत चेतनची आई केंद्रात त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हजर असताना तिला दुसºया दिवशी येण्यास सांगण्यात आले. रविवारी चेतनची आई व भाऊ करण त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले असता अर्जातील ‘अनोळखी’ नोंदीमुळे तो त्यांच्या ताब्यात देण्यात आला नाही. त्यासाठी चेतनचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणण्याचे फर्मान सोडण्यात आले. ते दाखवल्यानंतर रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास चेनतचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघातानंतर चेतनच्या खिशात ओळखपत्राचा पुरावा सापडूनही चेतनची अनोळखी म्हणून नोंद करणाºया पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी चेतनच्या नातलगांनी केली आहे.चेतनच्या अपघाती मृत्यूची पोलिसांनी अनोळखी म्हणून नोंद केल्याने त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आम्हाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सुरुवातीला पोलिसांकडून प्रतिसाद दिला जात नव्हता. परंतु, स्थानिक समाजसेवक अनिल नोटीयाल यांच्या प्रयत्नामुळे २४ तासांनंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला.- करण मोटवानी, मृत चेतनचा भाऊचेतनची अनोळखी नोंद चुकीने झाली असून यापुढे अशी चूक होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.- मीरा रोड रेल्वे पोलीस

टॅग्स :mira roadमीरा रोड