शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गर्दुल्ल्यांचा अड्डा झालेला स्कायवॉक पाडून टाका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : हद्दीवरून भिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादात महिलेला स्कायवॉकवरून खाली फेकणारा भिकारी हा गुर्दुल्ला असल्याचे उघड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : हद्दीवरून भिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादात महिलेला स्कायवॉकवरून खाली फेकणारा भिकारी हा गुर्दुल्ला असल्याचे उघड झाले आहे. कल्याणमधील एमएमआरडीएने बांधलेला स्कायवॉक हा गर्दुल्ल्यांचा अड्डा झाला असून, दिवसाढवळ्याही यावरून जाताना लोक जीव मुठीत घेऊन जातात. गर्दुल्ल्यांच्या हाणामाऱ्या, सर्वसामान्यांच्या अंगावर पैशाकरिता धावून जाणे, मुली-महिलांची छेड काढणे, अश्लील हावभाव करणे असे प्रकार सर्रास या स्कायवॉकवर सुरू असतात. मात्र याकडे ना पोलिसांचे लक्ष असते ना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे. त्यामुळे गर्दुल्ल्यांच्या ऐषोआरामाकरिता बांधलेला हा स्कायवॉक तोडून टाकण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

याआधी गर्दुल्यांकडून एका तरुणीची छेड काढण्याची घटना डिसेंबर २०२० मध्ये स्कायवॉकवर घडली होती. रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूककोंडी यातून सामान्यांची सुटका करण्याच्या नावाखाली २०१०-११ मध्ये कल्याण पश्चिमेकडे स्कायवॉकची उभारणी केली. एमएमआरडीएने बांधलेल्या स्कायवॉकची देखभाल राखण्याची जबाबदारी केडीएमसीची आहे. या स्कायवॉकवर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबरोबरच भिकारी, गुर्दुल्यांचा उपद्रव आहे. पहाटे अथवा रात्री उशिरा या स्कायवॉकवरून जायला कुणी धजावत नाही. दिवसाच स्कायवॉकवर भिकारी, गर्दुल्ले यांच्याकडून नैसर्गिक विधी करण्यापासून अश्लील चाळे करण्यापर्यंत अनेक गैरप्रकार सुरू असतात. त्यामुळे स्कायवॉक बकाल झाले आहेत. रविवारच्या घटनेनंतरही गुर्दुल्यांचा बंदोबस्त करण्यास संबंधित यंत्रणांना मुहूर्त मिळालेला नाही. डिसेंबरमधील छेडछाडीच्या प्रकरणानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून गर्दुल्यांसह भिकाऱ्यांना हुसकावून लावले होते. परंतु काही दिवस उलटताच ते परत आले. गुर्दुल्यांची एखादी टोळी याठिकाणी वावरत असल्याचे चित्र बुधवारी स्कायवॉकवर दिसले. बैलबाजार चौक आणि दीपक हॉटेलकडे जाणाऱ्या स्कायवॉकवर गुर्दुल्यांचा वावर प्रकर्षाने दिसला. स्कायवॉकवर गर्दुल्लयांचाच वावर असणार असेल तर तो हवाच कशाला? स्कायवॉक पाडून टाका, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

------

दोघा जणांवर सुरक्षेची जबाबदारी

डिसेंबरमध्ये घडलेल्या घटनेनंतर याठिकाणी केडीएमसीकडून दोन सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. ते केवळ रात्रीपुरतीच सुरक्षा देत असून, स्कायवॉकचा पसारा पाहता ही सुरक्षा तुटपुंजी आहे. त्यात रविवारचा प्रसंग दिवसाढवळ्या घडल्याने सुरक्षेअभावी चिंता अधिकच वाढली.

----------------------------------

बसमुळे बचावली; पण प्रकृती गंभीर

रिना शेखला राम ऊर्फ रामू सुरेश बांदलकर या गर्दुल्याने हप्ता न दिल्याने स्कायवॉकवरून खाली ढकलून दिले. तेथून जाणाऱ्या बसच्या टपावर ती प्रथम पडली आणि तेथून ती खाली रस्त्यावर कोसळली. यात तिच्या हातापायांना आणि बरगडीला गंभीर दुखापत झाली. अगोदर बसवर पडल्यामुळे ती बचावली अन्यथा थेट उंचीवरून जमिनीवर पडली असती तर तिचा जागीच मृत्यू झाला असता. तिच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

----

आनंद मोरे फोटो

वाचली