शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिहीन असूनही निसर्गोपचारात मिळविले प्राविण्य,किडनीच्या कर्करोगावरही प्रचंड इच्छाशक्तीतून केली मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 03:49 IST

डोंबिवली : जन्माने डोळस असलेल्या सुभाष वारघडे सायकलवरुन पडले आणि या अपघातात त्यांची दृष्टी गेली. त्यावर मात करून आयुष्याला दिशा देण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग झाला.

मुरलीधर भवार डोंबिवली : जन्माने डोळस असलेल्या सुभाष वारघडे सायकलवरुन पडले आणि या अपघातात त्यांची दृष्टी गेली. त्यावर मात करून आयुष्याला दिशा देण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग झाला. निसर्गोपचारातून या कर्करोगावर त्यांनी मात केली आणि पुढे निसर्गोपचार या विषयात कोलकत्ता विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविली आहे. निसर्गोपचारात डॉक्टरेट मिळविणारे ते देशातील पहिले दृष्टीहीन आहेत.वासिंद रेल्वे स्थानकापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वडीवली गावात वारघडे राहतात. त्यांचा जन्मही या गावातीलच. घरची परिस्थिती बेताचीच; पण त्यावर मात करुन त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पदवी शिक्षण घेतल्यावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या. त्यात ते यशस्वी ठरले. दरम्यानच्या काळात सायकलवरुन पडून त्यांना अपघात झाला. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांची दृष्टी गेली. पण खचून न जाता त्यांनी निसर्गोपचाराच्या शिक्षणाला सुरुवात केली.अंधत्वावर मात करण्यासाठी त्यांनी महालक्ष्मी येथील अंधत्व पुनर्वसन केंद्रात जाऊन ब्रेल लिपी शिकण्यास सुरुवात केली. डॉक्टर भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅक्युपंचर, मसाज याचे शिक्षण घेतले. नाशिकच्या आरोग्यधामात निसर्गोपचाराचा डिप्लोमा केला आणि २०१३ साली शहापूर व खारबाव येथे निसर्गोपचार केंद्र सुरु केले. हा सगळा प्रपंच सुरु असताना त्यांच्यावर आणखी एक संकट ओढवले. २०१४ साली वारघडे यांना किडनीचा कर्करोग झाला. उपचारासाठी त्यांनी टाटा कर्करोग रुग्णालयात धाव घेतल्यावर तपासणीत दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याचे त्यांना समजले. त्यानंतर वारघडे यांनी निसर्गोपचाराच्या माध्यमातून स्वत:च्या कर्करोगावर स्वत:च उपचार सुरु केले आणि दीड वर्षात त्यांना या कर्करोगावर पूर्ण मात करता आली. त्यानंतर वारघडे हे नॅशनल असोशिएशन फॉर ब्लार्इंड या दृष्टीहीनांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेत गेले. तेथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. निसर्गोपचाराच्या अनुभवातून त्यांनी डॉक्टरेट मिळविण्यासाठी डोंबिवलीतील निसर्गोपचार महाविद्यालयात प्रवेश घेतला. कोलकत्ता विद्यापीठातून वारघडे यांना नुकतीच डॉक्टेरटही मिळाली. डॉक्टर आॅफ मेडिसीन (अल्टरनेट मेडिसन) देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अंध व्यक्तीने निसर्गोपचारात डॉक्टरेट मिळविण्याचा पहिला मान वारघडे यांना मिळाला.>डोळसांच्या डोळ््यात अंजनज्या निसर्गोपचाराने त्यांना उपजीविकेचे साधन दिले. कर्करोगावर मात करण्याचे बळ दिले आणि डॉक्टरेटही मिळवून दिली, त्यातूनच ते चरितार्थ चालवतात.त्यांच्या पत्नी अंजना डोळस आहेत. मुलगा प्रथमेश चौथीत आणि लहान मुलगा प्रतिक पहिलीत शिकतो. जन्माने डोळस असलेल्या व नंतर अपघाताने अंधत्व आलेल्या वारघडे यांनी या व्यंगावर मात करत डोळसांच्या डोळ््यात अंजन घातले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका