शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने बंदी घालूनही मीरा भाईंदर मध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच 

By धीरज परब | Updated: February 13, 2023 19:47 IST

सरकारने बंदी घालूनही मीरा भाईंदर मध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे. 

मीरारोड : राज्य सरकार नंतर केंद्र सरकारने देखील एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी घातली असताना मीरा भाईंदर मध्ये मात्र सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर - विक्री राजरोस सुरूच आहे. तर पालिका उपायुक्तांनी स्वच्छता निरीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून देखील प्लास्टिक वापर सुरूच असल्याने कर्मचारीच अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याचे मानले जात आहे. 

महाराष्ट्रात २०१८ साली भाजपा - सेना युती शासनाने प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक ग्लास, प्लेट, चमचे, स्ट्रॉ, थर्माकॉल, प्लास्टिक पार्सल डब्बे आदींवर बंदी घातली. त्यात वाढ करून आता केंद्रातील भाजपा सरकारने कान साफ करण्यासाठी वापरली जाणारी प्लास्टिक नळी, फुग्या खालील प्लास्टिक नळी, कँडीची प्लास्टिक दांडी, आईस्क्रीमची प्लास्टिक दांडी, प्लास्टिक झेंडे व चाकू - ट्रे , मिठाई वा अन्य वास्तूच्या पॅकिंग साठी वापरली जाणारी प्लास्टिक फिल्म,  ग्रीटिंग कर, सिगारेट पाकीटसह १०० मायक्रॉन जाडी पेक्षा कमीचे प्लास्टिक वा पीव्हीसी बॅनर आदींचा सुद्धा १ जुलै पासूनचा बंदी मध्ये समावेश केला आहे. 

राज्य सरकार पाठोपाठ केंद्र सरकारने प्लास्टिकच्या भस्मासुराचा गंभीर धोका ओळखून बंदी लागू केल्यानंतर तरी कठोर अंलबजावणीसाठी महापालिका प्रशासन, नगरसेवक, राजकारणी आदी ठोस भूमिका घेतील असे अपेक्षित होते. मीरा भाईंदर मध्ये मात्र बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक वस्तूंचा वापर, विक्री सुरूच आहे . 

शहरातील फेरीवाल्यां पासून दुकानदार, खाद्य पेय पदार्थ विक्रेते, किराणा, हॉटेल आदी बहुतांश ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यां सह बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंची विक्री - वापर सुरु असल्याचे आढळून आले. सरकारच्या प्लास्टिक बंदीचा धाक जाणवत नाही.  

सरकारच्या प्लास्टिक बंदीचा पुरता फज्जा उडाला असून दुसरीकडे पालिका उपायुक्त रवी पवार यांनी प्लास्टिक पिशव्या आदींवर कारवाई होत नसल्या बाबत स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता अधिकारी सह सहायक आयुक्त कविता बोरकर यांना नोटीस बजावली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक विरोधात कारवाईची विशेष मोहीम राबवण्यास सांगून देखील कारवाई केली गेली नसल्याचे नमूद करत अहवाल सादर करायला सांगितला होता. अन्यथा तुमच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाईल असा इशारा सुद्धा दिला होता. त्या नोटिशींना महिना उलटून गेला असून दुसरीकडे शहरात बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर - विक्री उघडपणे सुरु असल्याने जबाबदार अधिकारीच उपायुक्तांना जुमानत नसल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेmira roadमीरा रोडPlastic banप्लॅस्टिक बंदी