शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

विरोधानंतरही अखेर कळवा, मुंब्य्राला आजपासून मिळणार ‘टोरंट’ची वीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 00:49 IST

कळवा आणि मुंब्रा-शीळवासीयांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजसमस्येला सामोरे जावे लागत होते. अखेर, आता या भागात आजपासून टोरंटमार्फत अखंडित वीजपुरवठा सुरू होणार आहे.

ठाणे : कळवा आणि मुंब्रा-शीळवासीयांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजसमस्येला सामोरे जावे लागत होते. अखेर, आता या भागात आजपासून टोरंटमार्फत अखंडित वीजपुरवठा सुरू होणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती टोरंटने दिली आहे. शिवाय, याबाबत असलेला विरोधही मावळला असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे टोरंटचा चेंडू नव्या महाविकास आघाडीच्या कोर्टात असून त्यावर आता विचारविनिमय सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून टोरंट हटावसाठी नारा दिला जात आहे. यामध्ये राजकीय मंडळींनी रस्त्यावर उतरून आंदोलनेसुद्धा केली आहेत. परंतु, त्यानंतरही राज्य शासनाने टोरंटला या भागात परवानगी दिली आहे. या भागात त्यांचे कार्यालयही सुरूझाले आहे. या यंत्रणेमुळे या भागातील वीजचोरी, विजेची तूट यामुळे महावितरणचे प्रचंड नुकसान होत होते. त्यामुळेच राज्य शासनाने येथील विजेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला. वीजवितरण आणि वीजबिलवसुलीचे कंत्राट निविदा सूचनेद्वारे देण्याचे जाहीर केले. त्यानुसार, ते टोरंट पॉवर या खाजगी कंपनीला दिले आहे.मुंब्रा-कळवा-दिवा विभागात पावसाळ्यात वीज खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. ते रोखण्यात येईल, असा दावा या कंपनीने केला आहे. तसेच २४ तास हेल्पलाइन सेंटरही उभारले आहे. खाजगीकरणानंतर अतिशय नियोजनबद्धपणे अखंडित वीज देण्याची ग्वाही कंपनीनेदिली आहे.दरम्यान, वीजग्राहकांच्या तक्रारीसाठी १८००२६७७०९९ हा हेल्पलाइन क्रमांकही सुरू केला आहे. तसेच ग्राहकांच्या सेवेसाठी कळवा, मुंब्रा आणि शीळ या भागात ग्राहक केंद्रे सुरू केली आहेत. तसेच कळव्याच्या शिवाजी हॉस्पिटलजवळ आणि मुंब्य्रातील मेक इंडस्ट्रिज कंपनीजवळ वीजबिल भरणा केंद्र सुरूकेले आहे. याबाबतीत असलेला विरोध काहीसा मावळला असून आता महाविकास आघाडीच्या कोर्टात टोरंटचा चेंडू आला आहे.>आधीच्या युती सरकारने चुकीच्या पद्धतीने कंपनीबरोबर करार केला होता. परंतु, याला स्थगिती दिली असतानाही काम सुरू आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांना निविदेनुसार काम मिळाले आहे. त्यामुळे काम बंद करायचे असेल, तर नुकसानभरपाई मागितली आहे. परंतु, यावर आम्ही आता योग्य तो तोडगा काढू, असा आमचा प्रयत्न आहे.- जितेंद्र आव्हाड, स्थानिक आमदार व राज्याचे गृहनिर्माणमंत्री