शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस सुरू होण्यापूर्वीच तलावांमधील गाळ काढा; जिल्हाधिकारी शिनगारेंचे आदेश

By जितेंद्र कालेकर | Updated: June 4, 2023 18:57 IST

गाळमुक्त धरण योजनेच्या कामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड तालुक्यातील गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी  शनिवारी दिवसभर पाहणी केली. पाणी साठा वाढविण्यासाठी तलाव/पाझरतलाव आणि गावतलावातील शंभर टक्के गाळ काढण्याची कामे येत्या १५ दिवसांत पूर्ण करावीत. यासाठी आवश्यक तेथे जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर आदी मशिनरी वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी दिले.

गावांमधील तलावांमधील जलस्त्रोतांचे बळकटीकरण व्हावे, पाणी साठा वाढण्यासाठी जिल्ह्यात दहा गावांमधील तलावांमधील गाळ काढण्याची कामे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून सुरू आहेत. यासाठी भारतीय जैन संघटना, वसुंधरा मंडळाचे सहकार्य घेण्यात येत आहे. त्यातील भिवंडी तालुक्यातील कोन गाव, केल्हे, शहापूर तालुक्यातील कसारा, मुरबाड तालुक्यातील पऱ्हे व शिरवली या गावांतील कामांची जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच तेथील सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधून कामांची माहिती घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उप विभागीय अधिकारी अमित सानप, उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील, तहसीलदार अधिक पाटील आदी उपस्थित होते.भिवंडीतील कोन गावातील गाव तलावाच्या कामांपासून पाहणी दौऱ्याची सुरूवात झाली. कृषि विभागाच्या सहकार्याने तलावाच्या शेजारी कन्व्हर्जन करून शेतीसाठी या तलावाच्या पाण्याचा वापर करा. तलावाच्या बांधावर बांबूची झाडे लावावीत, तसेच केलेल्या कामांचे डॉक्युमेंटेशन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. केल्हे गाव तलावातून पहिल्यांदाच गाळ काढण्यात येत असल्याचे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले. या गाव तलावाची सीमारेषा आखावी. मुरबाड तालुक्यातील पऱ्हे येथे आमदार किसन कथोरे, सरपंच सोमनाथ भोईर यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारीही दौऱ्याच्या वेळी उपस्थित होते. पऱ्हे गावतलावातील गाळ काढल्यामुळे पाणीसाठा वाढणार आहे. त्यामुळे गाळ काढण्याच्या कामाला वेग देण्याच्या सूचना केल्या. शिरवली धरणातील गाळ काढण्याचा शुभारंभ आमदार किसन कथोरे आिण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला.

ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा-

जलस्त्रोतांचे बळकटीकरणासाठी तलावांमधील गाळ काढणे आवश्यक आहे. त्यामुळे तलावातील पाणी साठा वाढेल. तलावातील गाळामुळे शेतात सुपिकता येईल. त्यामुळे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना प्रभावी असून प्रशासनाने तलावांमधील गाळ काढण्याच्या कामाला आणखी गती द्यावी. ग्रामस्थांनी योजनेत सहभाग नोंदवून तलावातील गाळ आपल्या शेतात न्यावा. तसेच तलावातील गाळ पाऊस सुरू होण्यापूर्वी काढण्यासाठी श्रमदान करण्याचे आवाहनही शिनगारे केले.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी