शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

देसले कुटुंबाची शासनाकडून परवड, पत्नीने दिला आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 03:44 IST

तहसीलदाराच्या त्रासाला कंटाळून १० मे २०१७ रोजी मुरबाड तालुक्यातील शेलगाव येथील शेतकरी अशोक शंकर देसले यांनी मुरबाड तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

मुरबाड : तहसीलदाराच्या त्रासाला कंटाळून १० मे २०१७ रोजी मुरबाड तालुक्यातील शेलगाव येथील शेतकरी अशोक शंकर देसले यांनी मुरबाड तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेस वर्ष उलटले तरी यासाठी जबाबदार तत्कालीन तहसीलदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसाहाय्य देण्याचे मिळालेले आश्वासनही अद्याप पूर्ण झालेले नाही. हे अर्थसाहाय्य मिळावे आणि त्या तहसीलदारावर कारवाई व्हावी, यासाठी अशोक देसले यांची पत्नी सुनीता आठ महिन्यांपासून प्रयत्न करत आहे. मात्र, कोणतीही हालचाल करत नसल्याच्या निषेधार्थ त्या कुटुंबासह १० मे रोजी तहसील कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करणार आहेत.तालुक्यातील शेलगाव येथील शंकर देसले यांची जमीन तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांनी संगनमताने त्यांच्या भावाच्या नावावर करून दिली होती. ही जमीन चुकीच्या पद्धतीने नावावर करून दिल्याची बाब अशोक देसले यांच्या निदर्शनास आल्याने झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी मुरबाड तहसीलदार कार्यालयात अर्ज दिला होता. या अर्जाची रीतसर चौकशी होऊन तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी दुरुस्तीचा अहवाल तत्कालीन तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील यांना दिला होता. परंतु, तहसीलदार म्हस्के-पाटील हे आदेश देण्यास चालढकल करत होते. नंतर, तर त्यांनी दोन लाखांची मागणी केल्याची माहिती अशोक देसले यांच्या पत्नीने दिली. हे पैसे देण्यासाठी १० मे २०१७ रोजी देसले मुरबाड येथे तहसील कार्यालयात गेले होते.मात्र, काम होत नाही म्हणून त्यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध होऊन घटनेस जबाबदार असलेले तत्कालीन तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील यांच्यावर फक्त बदलीची कारवाई केली. तसेच म्हस्के-पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे व देसले यांच्या पत्नीला मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसाहाय्य देण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले होते.>अशोक देसले यांच्या पत्नीला मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रकरण पाठवले आहे.- सचिन चौधर, तहसीलदार मुरबाड

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या