शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो स्थानकास गोडदेव नाव देण्यासाठी महापौर, आयुक्त, आमदार आदिंना ग्रामस्थांची निवेदने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 17:54 IST

प्रस्तावित मेट्रोच्या भार्इंदर क्रिडा संकुल येथील स्थानकास गोडदेव गाव असे नाव देण्याची मागणी करत ग्रामस्थांनी महापौर, उपमहापौर, आमदार तथा आयुक्यांना निवेदनं दिली असुन १५ दिवसात नावा बाबत निर्णय घ्यावा अन्यथा

मीरारोड - प्रस्तावित मेट्रोच्या भार्इंदर क्रिडा संकुल येथील स्थानकास गोडदेव गाव असे नाव देण्याची मागणी करत ग्रामस्थांनी महापौर, उपमहापौर, आमदार तथा आयुक्यांना निवेदनं दिली असुन १५ दिवसात नावा बाबत निर्णय घ्यावा अन्यथा महापौर - आयुक्त दालनां बाहेर ठिय्या आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय . मीरा भाईंदर शहरात मेट्रोच्या अद्याप थांगपत्ता नसला तरी मेट्रो स्थानकाच्या नामकरणावरुन वादंग निर्माण झालाय.  एमएमआरडीएने शहरातील मेट्रो स्थानकांची नावं सुचवली असता त्याचा प्रस्ताव आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी महासभेत आणला होता.  भाजपाचे रोहिदास पाटील यांनी ठराव मांडताना प्रशासनाने सुचवलेल्या क्रि डा संकुल स्थानका ऐवजी महाराणा प्रताप असे नांव दिले. भाजपाने तो बहुमताच्या बळावर मंजुर देखील केला.  तरशिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी क्रिडा संकुल स्थानकास गोडदेव हे पुर्वापार असलेल्या गावाचे नाव देण्याचा मांडलेला ठराव देखील भाजपाने फटाळुन लावला. या विरोधात गोडदेव गावातील ग्रामस्थांनी भाजपाचा निषेध व्यक्त करत गावातील विठ्ठल मंदिरात सभा घेतली. त्यात सभेत सर्वांना ग्रामस्थांचे निवेदन देण्याचे व १५ दिवसांची मुदत देण्याचे ठरले. त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, आयुक्त डॉ. नरेश गीते तसेच आमदार नरेंद्र मेहता यांना भेटुन निवेदन दिले आहे. निवेदना मध्ये गोडदेव हे पुर्वापार वसलेले गाव असुन स्थानिक आगरी - कोळ्यांची संस्कृती व वस्ती आहे. गोड पाण्याच्या विहरी असल्याने शहरातील लोकांची तहान भागवण्याचे मोठे कार्य या गाावचे आहे. महसुली नोंदी सह विविध शासकिय दप्तरी देखील गोडदेव गावचा उल्लेख आहे. महाराणा प्रताप यांचे नावास आमचा विरोध नाही. त्यांच्या बद्दल नेहमीच आदर आहे. परंतु त्यांचे नांव शहरातील अनेक जागांना दिले आहे. मात्र कुठल्याही स्थानकाचे नांव देताना स्थानिक गावाचा विचार होणे आवश्यक आहे. १५ दिवसात गोडदेव गाव असे नांव न दिल्यास पालिकेत ठिय्या आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय. महापौर, उपमहापौर व आयुक्तांना निवेदन देताना नगरसेविका तारा घरत, स्रेहा पांडे, हरिश्चंद्र आमगावकर सह विठोबा देवालय ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, खजिनदार वासुदेव पाटील, रमेश घरत, भालचंद्र पाटील, हेमंत पाटील, सचीन घरत, मिलन पाटील, अजय म्हात्रे, अ‍ॅड. सुशांत पाटील, प्रशांत पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. तर ग्रामस्थांनी महापौर मेहता व आमदार मेहता यांची भेट घेतली असता त्यांच्या कडुन मेट्रो स्थानकास गोडदेव गाव असे नाव देण्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे एका ग्रामस्थाने सांगीतले. त्यामुळे या प्रश्नी ग्रामस्थ आता स्थानिक आमदार प्रताप सरनाईक सह खासदार राजन विचारे, पालकमंत्री एकनाथ शिंदे व नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे त्या ग्रामस्थाने सांगीतले.