शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

उपमहापौरांचा राजीनामा : केडीएमसीतही भाजप विरोधी बाकावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 00:56 IST

२०१५ च्या केडीएमसी निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वबळावर लढले होते. मात्र, सत्तेसाठी शिवसेना-भाजपची युती झाली होती.

- मुरलीधर भवारकल्याण : राज्यातील बदलते राजकीय समीकरण व शिवसेनेने महापौर पदासाठी डावलल्याने बेकायदा बांधकामांचे निमित्त काढून भाजपच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी महापौर विनीता राणे यांना सादर केला. ऑक्टोबरमध्ये महापालिकेची निवडणूक असून तत्पूर्वी विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेऊन शिवसेनेविरुद्ध आक्रमक पवित्रा घेण्याचे भाजपने ठरवले आहे.२०१५ च्या केडीएमसी निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वबळावर लढले होते. मात्र, सत्तेसाठी शिवसेना-भाजपची युती झाली. त्यावेळी पाच वर्षांपैकी महापौरपद पहिले अडीच वर्षे शिवसेना, मधले दीड वर्षे भाजप तर, उर्वरित काळ पुन्हा शिवसेनेला दिले जाईल, असे ठरले होते. तसेच स्थायी समिती सभापतीपद भाजपला देण्याचा अलिखित करार झाला. मात्र, उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या समीकरणात केडीएमसीतील महापौरपद शिवसेनेने आपल्याकडे कायम ठेवले. दरम्यान, आता शेवटचे वर्षे भाजपला महापौरपद देण्याची वेळ आली असताना ते पद दिले नाही.भाजपचा दावा असलेले स्थायी समिती सभापतीपद मिळवण्याचे मनसुबे शिवसेनेने राखले होते. मात्र, यात भाजपने शिवसेनेवर मात करत हे पद हिसकावून घेतले. परंतु, दुसरीकडे उपमहापौर पदाचा राजीनामा भोईर यांनी दिला नाही. शिवसेनेच्या मते त्यांनी आधी राजीनामा द्यायला हवा होता. तसे केले असते तर, भाजपला स्थायीचे सभापतीपद सोडले असते. सेना स्थायीचे सभापतीपद देत नसल्याने भाजपनेही उपमहापौरपद सोडले नाही. स्थायी समिती भाजपच्या हाती आल्याने त्यांना आता उपमहापौर पदात रस नाही. त्यामुळे त्यांनी बेकायदा बांधकामांचा मुद्दा मांडत एक राजकीय खेळी खेळली आहे.बेकायदा बांधकामामुळे महापालिका नेहमीच चर्चेत आहे. अग्यार समितीनुसार ६८ हजार बेकायदा बांधकामे झाली आहेत. तसेच बेकायदा बांधकाम प्रकरणाची याचिका न्यायप्रविष्ट आहे. भाजपनचे हाच मुद्दा उपस्थित करीत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हे एकच कारण भोईर यांच्या राजीनाम्यासाठी पुरेसे नाही. भोईर यांनी राजीनामा दिल्यावर त्यांना विरोधी पक्ष नेतेपदी विराजमान करण्यासाठी भाजपचे पत्र तयार होते. मात्र, या खेळीचा अंदाज महापौरांना आल्याने त्यांनी सोमवारी महासभेत न बसता आजारपणाचे कारण पुढे करीत सभेतून बाहेर जाणे पसंत केले.दरम्यान, भोईर यांनी राजीनामा मंगळवारी महापौर कार्यालयात सादर केला. तो स्वीकारल्याची पोहोच महापौर कार्यालयातून त्यांना मिळाली आहे. हा राजीनामा स्विकारला जाणार की नाही याविषयी तज्ज्ञांच्या मते राजीनामा दिल्यावर तो आपोआपच लागू होतो. त्याला स्वीकारण्याची गरज नाही. आता भाजपला महापौर पद न देणाऱ्या शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी भोईर यांचे राजीनामा नाट्य आहे की, खरोखरच बेकायदा बांधकामांचा मुद्दा त्याच्या आडून उपस्थित केला जात आहे, हे महत्त्वाचे आहे. भोईर यांचा डोळा विरोधी पक्ष नेते पदावर आहे. सध्या मनसे विरोधी बाकावर आहे. मात्र, मनसेने भाजपला स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले. त्याच भाजपकडून विरोधी पक्ष नेतेपद हिसकावून घेतले जाणार असेल तर भाजपला शिवसेना झुंजवत ठेवणार की, भाजपला मतदान करणाºया मनसेला त्यांची जागा दाखविण्यासाठी शिवसेनेला आयतीच संधी चालून आली आहे. तिचा शिवसेना लाभ उठविणार हे देखील महत्त्वाचे आहे. भाजपमुळे मनसे विरोधी पक्ष नेता पद गामावू शकते ही दाट राजकीय शक्यता नाकारतायेत नाही.ओरड नेमकी कोणाविरोधात?शिवसेनेच्या मते महापौरपद आम्ही दिलेले नाही. मात्र राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्ननुसार भाजपला धडा शिकविण्याची चालून आलेली संधी शिवसेना दवडणार नव्हती. भोईर व अन्य भाजप सदस्यांच्या प्रभागात विकासकामे झालेली नाहीत. आता त्यांच्याकडे स्थायी समिती आहे. तरीही विकासकामे होत नसल्याची ओरड ही प्रशासनाविरोधात की, शिवसेनविरोधात? असा प्रश्न आहे. यापूर्वीही स्थायीचे सभापतीपद दोनदा भाजपकडे होते. त्यामुळे विकासकामे होत नाहीत, ही भाजपकडून केली जाणारी ओरड हा केवळ राजकीय बनाव आहे. महापालिका निवडणूकजवळ आल्याने त्यांनी आता हातपाय आपटायला सुरुवात केली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणBJPभाजपा