शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

इम्पॅक्ट... उपायुक्त, शिक्षणाधिकाऱ्यांनी केली टेंभी नाका शाळेची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 07:42 IST

भंगार हटवून जागा करणार मोकळी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : टेंभी नाक्यावरील महापालिकेच्या शाळेतील भीषण दुरवस्थेबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच शिक्षण विभागाला खडबडून जाग आली. ‘ना छप्पर, ना प्रयोगशाळा’ या मथळ्याखालील या वृत्ताची तातडीने दखल घेत ठाणे महापालिका शिक्षण विभागाचे उपायुक्त आणि शिक्षणाधिकारी यांनी शाळा क्रमांक १७ मध्ये ताबडतोब धाव घेऊन पाहणी केली. या शाळेची त्वरित दुरुस्ती केली जाणार आहे, तर शाळा क्र. १६ ला भेट देऊन आवश्यक ती कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

शिक्षण विभागाचे उपायुक्त उमाकांत गायकवाड आणि शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी तातडीने पाहणी केली. सकाळी राक्षे यांनी भेट दिली. त्यानंतर गायकवाड यांनी दुपारी सर्व परिस्थिती पाहिली. गळणाऱ्या वर्गखोल्यांमधील विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्गांमध्ये बसवले जाणार आहे. शाळेमध्ये रचून ठेवलेले भंगार काढून खोल्या रिकाम्या केल्या जातील. रिकाम्या जागेत मुख्याध्यापकांना बसण्याची जागा आणि प्रयोगशाळेसाठी खोली दिली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त गायकवाड यांनी दिली. 

याआधीही शिक्षण विभागाने प्रभाग समितीकडे दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला होता. परंतु, या वृत्तानंतर प्रशासनाला जाग आली असून, त्यांनी दुरुस्तीचे काम मनावर घेतले आहे. शाळा क्रमांक १६ ची लवकरच पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती केली जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी घेतली शाळामुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड परिसरातील पालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था कशी बिकट आहे, याचा आढावा लोकमतने मंगळवारच्या अंकात घेतला आणि यंत्रणा हलल्या. काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. कुठे बैठका झाल्या, अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. काही शाळांतील विद्यार्थ्यांचे वर्ग बदलले गेले. यामुळे परिस्थिती बदलेल अशी आशा शिक्षक, विद्यार्थी, पालकांना आहे...

 

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळाMuncipal Corporationनगर पालिका