शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लागले उल्हासनरगरचे ग्रहण?

By सदानंद नाईक | Updated: March 17, 2023 17:48 IST

अनिल जयसिंगानी होते राष्ट्रवादीचे नगरसेवक, भाजप नेत्यांचे याबाबत मौन

सदानंद नाईक, उल्हासनगर: राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणारी अनिष्का ही राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगरसेवक व आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुक्की अनिल जयसिंगांनी यांची मुलगी असल्याचे उघड झाले. नेहमी पोलीस संरक्षणात राहिलेले अनिल जयसिंगानी गेल्या ८ वर्षांपासून विविध गुन्ह्यात फरार आहे. उल्हासनगरात अनिल जयसिंगानी हे सुरवातीला काँग्रेस पक्षात होते. त्यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर दोनवेळा नगरसेवकांची निवडणूक लढविली होती. सन-२००२ मध्ये महापालिका सार्वजनिक निवडणुकीपूर्वी तत्कालीन आमदार पप्पु कलानी यांची जेल मधून मुक्तता झाल्यावर, शहरात कलानीमय वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा माजी आमदार ज्योती कलानी होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढविली जाऊन, राष्ट्रवादी पक्षाला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले. या कलानी लाटेत अनिल जयसिंगानी हे राष्ट्रवादी पक्षाकडून नगरसेवक पदी निवडून आले होते. नेहमी पोलीस संरक्षणात वावरणारा अनिल जयसिंगानी यांच्याकडे महागडे कुत्रे होते. पोलीस किंवा अन्य कोणी त्याच्या घरी गेल्यास, कुत्रे सोडून दिले जात होते. 

वरिष्ठ राजकीय नेत्यांसोबत उठबस असलेले अनिल जयसिंगानी नगरसेवकपदी असतांना क्रिकेट सट्टा प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या घरी धाड टाकून गुन्हे दाखल झाल्यावर एकच खळबळ उडाली. तेंव्हा पासून जयसिंगानी नेहमी वादात राहिले. तसेच त्यांचे वडील अर्जुन जयसिंगांनी यांच्यावरही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सांगतात. अनिल जयसिंगानी हे गेले ८ वर्षापासून विविध गुन्ह्यात फरार आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे म्हणून मुलगी अनिष्का हिने थेट उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या पत्नीला १ कोटींची लाच देण्याचे आमिष दाखवून व ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मलबार हिल येथे गुन्हा दाखल होऊन अनिष्काला उल्हासनगर येथील घरातून अटक केली. तसेच तिच्या भावालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. अनिष्का हीने उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सोबत लगट केलीच कशी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा उल्हासनगराचा नामचीन गुंडा सोबतचा फोटो व्हायरल

केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे भिवंडी येथे आले होते. यावेळी न्यायालयाने ठाणे बंदी घातलेला उल्हासनगरचा नामचीन गुंड रोशन झा सोबत फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसulhasnagarउल्हासनगर