शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी उल्हासनगरात; २५ कोटी निधीतील विकास कामाचे उद्घाटन करणार

By सदानंद नाईक | Updated: January 5, 2024 20:02 IST

अजित पवार हे पक्षाचे माजी गटनेते भारत गंगोत्री यांना दिलेल्या २५ कोटी निधीतील विकास कामाच्या उद्घाटनासाठी रविवारी उल्हासनगरात येणार आहेत.

उल्हासनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे माजी गटनेते भारत गंगोत्री यांना दिलेल्या २५ कोटी निधीतील विकास कामाच्या उद्घाटनासाठी रविवारी उल्हासनगरात येणार आहेत. यावेळी तरी शहराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उल्हासनगर महापालिकेचे माजी सभागृहनेते व गटनेते भारत गंगोत्री यांना त्यांच्या प्रभागातील विविध विकास कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या ३ वर्षांपूर्वी २५ कोटीचा निधी दिला होता. त्या निधीतून उभे राहिलेल्या विकास कामाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी दुपारी अड्डीच वाजता होणार आहेत. यावेळी पुष्पपवन उद्यान, नेताजी उद्यान, रस्ते आदी विकास कामाचे उदघाटन होणार असल्याची माहिती भारत गंगोत्री यांनी दिली आहे. मात्र राष्ट्रवादी शहराध्यक्ष पदाची निवड अद्याप झाली नसल्याने, यावेळी शहराध्यक्ष पदाची निवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अजित पवारांनंतर मुख्यमंत्र्यांचा दौराउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी दिलेल्या २५ कोटीच्या निधीतील विकास कामाचे उदघाटनसाठी रविवारी उल्हासनगरात येणार आहेत. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध विकास कामाच्या उदघाटनाला येणार असून यामध्ये महापालिका रुग्णालय, सिंधुभवन, तहसील प्रांगणातील व प्रांत कार्यालयाची प्रशासकीय इमारत, तालुका क्रीडा संकुल आदींचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरAjit Pawarअजित पवार