शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

श्वानप्रेमींमध्ये लसीकरणाबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 04:04 IST

१९ ते २५ सप्टेंबरदरम्यान राबविणार विशेष मोहीम

- जान्हवी मोर्ये डोंबिवली : श्वानप्रेमी हौशीने घरात श्वान पाळतात. मात्र, अनेकांमध्ये त्यांच्या लसीकरणाविषयी उदासीनता आहे. घरातील पाळीव श्वानही दंश करतात. त्याचे प्रमाणे भटक्या श्वानांपेक्षा जास्त आहे. मात्र, ते उघड होत नाही, अशी माहिती प्राण्यांचे डॉक्टर मनोहर अकोले यांनी १९ ते २५ सप्टेंबर या श्वानदंश प्रतिबंधात्मक लसीकरण जनजागृती मोहिमेनिमित्त दिली.केडीएमसी हद्दीत १२ ते १३ हजार पाळीव श्वानधारक आहेत. पाळीव श्वान कुणाला चावत नाही, अशी त्यांच्या मालकांची समजूत असते. श्वानाचे दरवर्षी लसीकरण आवश्यक आहे. श्वान मालकांमध्ये त्याविषयी जागृती झाली पाहिजे. महापालिकेतर्फे श्वान निर्बिजीकरण केंद्रही योग्य पद्धतीने चालविले जात नाही. त्यामुळे सामाजिक संस्थांना पुढाकार घेऊन श्वानदंश प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम हाती घ्यावी लागत आहे, असे अकोले यांनी सांगितले.डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागात ७७ श्वानप्रेमी आहेत. प्रत्येक जण लसीकरणासाठी अंदाजे १० ते १२ श्वानांना आणतात. सामाजिक संस्थांतर्फे घेतल्या जाणाऱ्या सप्ताहात ९०० श्वानांना लसीकरण केले जाते. हा आकडे पुरेसा नाही. मात्र, यामुळे समाजात जागृती होण्यास मदत होते. या सप्ताहात भटक्या श्वानांना दत्तक घेणारे, तसेच त्यांना खाऊ घालणारेही पुढाकार घेऊन श्वानांना लसीकरण करून घेतात.लसीकरण केल्यामुळे चावा घेणाºया श्वानांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कोणत्या श्वानांना लसीकरण केले आहे, हे नीटसे सांगता येणार नाही. पण विभागानुसार श्वानांची नोंदणी केली जाते. श्वानप्रेमींनाही त्याची माहिती असते, असे अकोले म्हणाले.रोटरी क्लब आॅफ डोंबिवली मिडटाउनतर्फे १९ ते २५ सप्टेंबरदरम्यान डोंबिवली व परिसरातील भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यात श्वानप्रेमी, प्राणीमित्र, राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. केडीएमसीचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ होईल. २८ सप्टेंबरला एका फेरी काढण्यात येणार आहे. त्यात विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम गुलाब पावले, कैलाश सोनावणे, डॉ. अकोले यांच्या पुढाकाराने होणार आहे.रेबिजमुळे वर्षाला ३५ हजार जणांचा मृत्यूरेबिज झालेला श्वान एखाद्या व्यक्तीला चावल्यास ती व्यक्ती मृत्युमुखी पडू शकते. सध्या देशात दरवर्षी ३५ हजार लोक मरण पावतात. तरीही लसीकरणाविषयी अनास्था दिसून येते.

 

टॅग्स :dogकुत्राdombivaliडोंबिवली