शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

आयुर्वेद संशोधनाबाबत उदासीनता : जयंत पुजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 04:31 IST

डोंबिवलीत कार्यक्रम : ‘आधुनिक काळातील आयुर्वेद’

डोंबिवली : शास्त्रात भर घालण्यासाठी संशोधन केले जाते. आयुर्वेदात आधुनिक पद्धतीने पहिला रिसर्च पेपर प्रसिद्ध झाला, त्याला ११६ वर्षे झाली. गुळवेलवर १५ हजार ३००, अश्वगंधा ३० हजार ३००, शतावरी ११ हजार ७०० पेपर आहेत. त्यानंतरही आयुर्वेदात कोणतीच भर पडलेली नाही. आयुर्वेद आधुनिक विज्ञानाच्या भाषेत मांडण्यासाठी १०० वर्षे संशोधन झाले. आयुर्वेद चिकित्सकाला त्यांचा उपयोग झाला नसून तो उदासीन झाला आहे, अशी खंत डॉ. जयंत पुजारी यांनी व्यक्त केली.

डोंबिवलीतील एका कार्यक्रमात ‘आधुनिक काळातील आयुर्वेद’ या विषयावर ते बोलत होते. पुजारी म्हणाले, आयुर्वेदात कोणताही रोग असो, त्याबाबत पथ्ये दिली आहेत. एमबीबीएसचा अभ्यासक्रम सोडून विद्यार्थी आयुर्वेदाकडे येत आहे, ही एक चांगली बाब आहे. प्रयोगशीलता आणि नावीन्यतेचा यामध्ये अभाव दिसून येत आहे. हे शिक्षण अ‍ॅलोपॅथीसारखे शिकवून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.आयुर्वेदात सुरुवातीला २५० च्या आसपास ग्रंथसंपदा पाहिल्यावर एवढीच ग्रंथसंपदा आहे का, असा प्रश्न पडला. २००० वर्षांत एवढीच ग्रंथसंपदा कशी आहे, हा प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हता. ग्रंथालय पाहण्यास सुरुवात केली, त्यावेळी अनेक पुस्तके समोर आली. सरकारने काही वर्षांपूर्वी जगाचा सर्व्हे केला, असे ते म्हणाले.भारतीय वाड्.मय संस्कृत आणि प्राकृत स्वरूपात किती ग्रंथसंपदा आहे, हा आकडा जाहीर केला. तो तीन कोटी पुढे आला. त्यातील एक टक्क्याच्या एक तृतीयांश आकडा आयुर्वेद ग्रंथसंपदेचा पकडला, तरी तो एक लाख आहे, असे समजू शकतो. आजचा आयुर्वेद फार तर ३०० ते ४०० ग्रंथसंपदेचा वापर करतो. नवीन ग्रंथसंपदेचा त्यात समावेश नाही, अशी खंत पुजारी यांनी व्यक्त केली.अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदाला स्वतंत्र ओळखमंगेश देशपांडे : ‘उत्कर्ष’मध्ये मार्गदर्शनडोंबिवली : आरोग्यशास्त्रात ९० प्रकारच्या पॅथी आहेत. त्यातील अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदाला स्वत:ची ओळख आहे. अ‍ॅलोपॅथी ही रोग झाल्यावर काय करावे हे सांगते, तर आयुर्वेद रोग होऊ नये आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतो, असे मत वैद्य मंगेश देशपांडे यांनी व्यक्त केले.

टिळकनगर विद्यामंदिरच्या पटांगणावर नुकतीच ‘उत्कर्ष व्याख्यानमाला’ झाली. या व्याख्यानमालेद्वारे तरुण वक्ता आणि श्रोता तयार करण्याचे काम ही संस्था १७ वर्षे करत आहे. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी आणि कार्यवाह डॉ. महेश ठाकूर, अमोघ देवस्थळी उपस्थित होते. या व्याख्यानमालेत देशपांडे बोलत होते. देशपांडे म्हणाले की, आयुर्वेदात करिअर करून स्वत:ची प्रॅक्टिस करता येते. प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवता येते. औषधनिर्मिती कारखान्यात काम करता येते. संशोधन करण्याची ही संधी मिळते. आयुर्वेदात नेत्रतज्ज्ञ किंवा स्पेशालिस्ट असा कुणी नसतो. एक आयुर्वेदिक डॉक्टर सर्व व्याधींवर औषधे देतो. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी सूर्याेदयापूर्वी उठावे, रोज व्यायाम करावा, संतुलित आहार घ्यावा. अन्न योग्य प्रकारे चावून न खाल्ल्याने १५० आजार होतात, असेही ते म्हणाले.‘समाजासाठी काहीतरी करा’स्वत:साठी काम करणाऱ्यांची कोणीही दखल घेत नाही. पण, लोकांसाठी आणि समाजासाठी काम केले, तर ती व्यक्ती इतिहास घडवते. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी समाजासाठी काम करून इतिहास घडवला, म्हणून स्वत:पेक्षा समाजासाठी काम करा, असेही देशपांडे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका